
Parshvakonasana : पार्श्वकोनासन
पार्श्वकोनासन हे दंडस्थितीमधील आसन आहे.
असे करावे आसन
प्रथम ताठ उभे राहावे. त्यानंतर दोन्ही पायात साधारण अडीच ते तीन फुटांचे अंतर घ्यावे. (उंचीनुसार कमी-जास्त अंतर घेणे.)
दोन्ही हात बाजूने खांद्याच्या रेषेत जमिनीला समांतर येतील एवढेच वर घ्यावे.
नंतर उजवे पाऊल उजव्या बाजूला वळवावे. उजवा पाय गुडघ्यात वाकवून साधारण मांडी व पोटरीमध्ये काटकोन असेल असे बघावे. उजवी मांडी जमिनीला समांतर असावी.
उजवा गुडघा घोट्याच्या पुढे जाणार नाही ही काळजी घ्यावी.
हळू हळू कमरेतून उजव्या बाजूला वाकावे आणि उजव्या हाताचा तळवा उजव्या पावलाच्या मागच्या किंवा पुढच्या बाजूला जमिनीवर टेकवावा.
डावा हात वरच्या बाजूला घेऊन डावा दंड डाव्या कानाला टेकवावा.
डाव्या हाताचा तळवा जमिनीकडे वळलेला असावा.
छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे आसनस्थिती घ्यावी.
एकाबाजूला आसन करून झाले की दुसऱ्या बाजूनेही करावे.
आसनाचे फायदे
या आसनाच्या नियमित सरावाने कंबरेला, पायाला, खांदा व हातात उत्तम ताण बसतो. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.
तेथील स्नायूंची लवचिकता व ताकद वाढते.
शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. वात कमी होतो.
फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढल्याने अस्थमा, बालदमा, श्वसनाचे त्रास कमी होण्यास मदत होते.