भविष्य

मेष:
शासकीय कामात यश लाभेल. प्रवास सुखकर होतील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.
वृषभ:
मनोबल, उत्साह वाढेल. वैवाहिक सौख्य लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन:
आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायाच्या दृष्टीने चांगला दिवस आहे.
कर्क:
आरोग्य चांगले राहील. नवे स्नेहसंबंध जुळतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.
सिंह:
महत्त्वाची कामे पुढे ढलावीत. प्रवासाचे योग येतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
कन्या:
आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग येतील.
तूळ:
सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दबदबा वाढणार आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.
वृश्चिक:
आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगली संधी लाभणार आहे. प्रसिद्धी लाभणार आहे.
धनु:
महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मकर:
शासकीय कामात यश लाभेल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कुंभ:
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
मीन:
नवे स्नेहसंबंध जुळतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. संततिसौख्य लाभेल.
रविवार, जानेवारी 20, 2019 ते शनिवार, जानेवारी 26, 2019
मेष:
या सप्ताहात शुभाशुभ ग्रहयोगांचा धुमाकूळ राहील. न दिसणाऱ्या चंद्रग्रहणाच्या पार्श्‍वभूमीवर अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सार्वजनिक जीवनातून त्रास. नोकरीत विचित्र ताण-तणावांची शक्‍यता. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना नुकसानीचं भय. मात्र, ता. २२ व २३ हे दिवस अतिशय शुभ. पती वा पत्नीचा भाग्योदय. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग.
वृषभ:
गुरू-शुक्र युतियोगाच्या पार्श्‍वभूमीवर शुभ ग्रहांच्या मंत्रालयांतून मोठे लाभ होतील. ता. २३ ते २५ हे दिवस मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सर्वतोपरी शुभ. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ व २२ हे दिवस कुयोगांच्या पार्श्‍वभूमीवर अतिशय असुरक्षित. पैशाचं पाकीट जपा. राजकीय कुप्रवृत्तींपासून दूर राहा. जुगार टाळा.
मिथुन:
शनी-मंगळ कुयोगांनी प्रभावित होणारी रास. घरी शांत बसा! ता. २१ व २२ या पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रातल्या पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी आचारसंहिता पाळावी. नका करू कुणालाही ओव्हरटेक! आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २४ व २५ हे दिवस महत्त्वाच्या कामांचे. विशिष्ट सुवार्ता कळतील.
कर्क:
कुयोगांच्या पार्श्‍वभूमीवर तुम्ही शुभ ग्रहयोगांची स्पंदनं खेचून घेणार आहात. ता. २२, २३ आणि २४ हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्ती मैदान जिंकणार आहेत. येणाऱ्या संधींसाठी दबा धरून बसा! पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २१ व २२ हे पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र संसर्गजन्य बाधेचं. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना यंत्रपीडा.
सिंह:
पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी या सप्ताहात गुरू-शुक्र युतियोगाचं सुंदर पॅकेज राहील. ता. २४ व २५ हे दिवस चमत्कार घडवणारे. तरुणांना ऑनलाईन क्‍लिक होणारे. काहींचे वास्तुविषयक व्यवहार मार्गी लागतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासच्या काळात दुखापतींची शक्‍यता. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात धनलाभ.
कन्या:
पौर्णिमेच्या आसपासच्या काळात शनी-मंगळ कुयोगाचा मोठा प्रभाव राहील. घरातल्या लहान मुलांची काळजी घ्या. विद्युत्‌उपकरणांपासून सांभाळून राहा. बाकी, सप्ताहात ता. २५ व २६ हे दिवस हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना अप्रतिम फळं देणारे. विवाहप्रकरणांचा पाठपुरावा करा. या सप्ताहात तरुणांना व्हिसा मिळेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग.
तूळ:
पौर्णिमेच्या आसपासची शनी-मंगळ कुयोगाची पार्श्‍वभूमी विशेष दखलपात्र. घरी वा दारी भावनोद्रेक टाळा. गावगुंडांपासून सावध. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत कष्ट करावे लागतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २३ व २४ हे दिवस अतिशय शुभदायी. विशिष्ट गाठी-भेटी होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक खरेदी-विक्रीतून लाभ.
वृश्चिक:
पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात परस्परविरोधी ग्रहमान राहील. काहींना कायदेशीर प्रकरणांतून त्रास शक्‍य. घरात भावंडांशी मतभेदांची शक्‍यता. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत हितशत्रुपीडा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २३ ते २५ हे दिवस मोठ्या जल्लोषाचे. तरुणांना प्रगतीचा उत्तम मार्ग गवसेल. परदेशी जाण्याची संधी. जीवनसहचरी लाभेल!
धनु:
पौर्णिमेच्या आसपासच्या काळात ग्रहयोगांसंदर्भात ट्रॅफिक जॅम राहील. विचित्र अनपेक्षित घटनांचा प्रभाव. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचं ग्रहमान. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासच्या काळात आजारी व्यक्तींची चिंता. त्यांची सर्वतोपरी काळजी घ्या. बाकी, ता. २४ ते २६ हे दिवस तुमच्या राशीला शुभग्रहयोगांच्या माध्यमातून उत्तमच. नोकरीचा लाभ.
मकर:
पौर्णिमेच्या आसपासच्या काळात न दिसणाऱ्या चंद्रग्रहणामुळे प्रभावित होणारी रास. प्रिय व्यक्तींची गुप्त चिंता सतावेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींच्या फसवणुकीची शक्‍यता. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट अप्रतिम. नोकरीत सुवार्ता मिळतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून सुखद धक्का. इच्छुकांचं परदेशगमन.
कुंभ:
शनी-मंगळ कुयोगातून पौर्णिमेच्या आसपासच्या काळात ग्रहांची ‘टाईट फील्डिंग’ राहील. दुष्टसंपर्क होईल. वैवाहिक जीवनात काळजी घ्या. दुखापतींपासून सांभाळा. बाकी, शततारका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २४ ते २६ या दिवसांत गुरू-शुक्र युतीचं सुंदर पॅकेज असेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचा परिचयोत्तर विवाह. ऑनलाईन ॲक्‍टिव्ह राहा.
मीन:
शनी-मंगळ कुयोगाची पार्श्‍वभूमी रेवती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी दखलपात्र राहील. गर्भवतींनी पौर्णिमेच्या आसपासच्या काळात दक्षता बाळगावी. यंत्र, वाहन वा उपकरणं दगा देऊ शकतात. बाकी, ता. २४ ते २६ हे दिवस तुमच्या राशीला उत्तम साथसंगतीचे. तरुणांना मोठं यश. परदेशगमनाचा योग. मान-सन्मान मिळतील.

ताज्या बातम्या