भविष्य

मेष:
प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कामामध्ये चुका होण्याची शक्‍यता आहे.
वृषभ:
काहींना विविध लाभ होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकाल.
मिथुन:
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. गुंतवणुकीस व प्रॉपर्टीस दिवस चांगला आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
कर्क:
तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला सुसंधी लाभेल. साहित्य क्षेत्रातील व्यक्‍तींना दिवस विशेष अनुकूल आहे. अनुभव व जिद्द वाढेल.
सिंह:
वादविवादामध्ये सहभाग टाळावा. आर्थिक लाभ मात्र समाधानकारक होतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
कन्या:
वैवाहिक जीवनामध्ये सुसंवादाचे वातावरण राहील. प्रवासास दिवस अनुकूल आहे. प्रकृती उत्तम राहील.
तूळ:
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. शत्रुपिडा फारशी जाणवणार नाही.
वृश्चिक:
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक असणार आहे. मुलामुलींसाठी वेळ देवू शकाल. सौख्य व समाधान लाभेल.
धनु:
हितशत्रुंवर मात करू शकाल. नोकरीमध्ये तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मकर:
सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. प्रवासास दिवस अनुकूल आहे. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल.
कुंभ:
कौटुंबिक जीवनामध्ये एखादी आनंददायी घटना घडेल. मनोबल वाढेल. आर्थिक कामे उरकून घ्यावीत.
मीन:
तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. वैवाहिक सौख्य लाभेल. चंद्र तुमच्याच राशीत आहेत.
रविवार, ऑक्टोबर 21, 2018 ते शनिवार, ऑक्टोबर 27, 2018
मेष:
गर्दीच्या ठिकाणी चीजवस्तू जपा राशीचा हर्षल ग्रहयोगात सापडत आहे. आश्‍विनी नक्षत्रव्यक्तींनी पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात अपघातापासून जपा. गर्दीच्या ठिकाणी चीजवस्तू जपा. भरणी नक्षत्रास ता. 25 व 26 ऑक्‍टोबर हे दिवस मोठे गतिमान. कार्टात यश. कृत्तिका नक्षत्रास एखादं स्पर्धात्मक यश.
वृषभ:
नोकरीत सुवार्ता शक्‍य कृत्तिका नक्षत्रास ता. 23 ऑक्‍टोबरची पौर्णिमा मनपसंद गाठीभेटींची. घरात कोणाचा विवाह ठरवाल. रोहिणी नक्षत्रास सप्ताहाचा शेवट उंची खरेदीचा. ता. 26 ची शुक्रवारची संध्याकाळ अतिशय प्रसन्न राहील. नोकरीतील सुवार्ता धन्य करेल. स्त्रीच्या सहकार्यातून कामं.
मिथुन:
गुंतवणुकी यशस्वी होतील सप्ताहात मोठं चंद्रबळ राहील. आर्द्रा नक्षत्रव्यक्ती मोठा लाभ उठवतील. नोकरीच्या संधींवर लक्ष ठेवा. सप्ताहाच्या शेवटी रवी-शुक्र युतियोगाचा उत्तम प्रभाव. थोरामोठ्यांबरोबर उठबस होईल. पुनर्वसू नक्षत्रास कोजागरी पौर्णिमा सुवार्तांतून मौजमजेची. गुंतवणुकी यशस्वी होतील.
कर्क:
प्रिय व्यक्तींचा सहवास सप्ताह पौर्णिमेच्या प्रभावात शुभग्रहांची ताकद वाढवेल. पुष्य नक्षत्राची हुकमी कामं होतील. पौर्णिमेजवळ प्रिय व्यक्तींचा सहवास. प्रेमिकांच्या आणाभाका. पुनर्वसू नक्षत्रास ता. 26 चा शुक्रवार वैयक्तिक मोठ्या उत्सवप्रदर्शनाचा. आश्‍लेषा नक्षत्रास पुत्रोत्कर्ष थक्क करेल.
सिंह:
नोकरीतून परदेशगमनाची संधी रवी-शुक्र युतियोग नोकरीतील आसन बळकट करेल. नोकरीतून परदेशगमनाची संधी मिळेल. पूर्वा नक्षत्रास ता. 24 ते 26 ऑक्‍टोबर हे पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र काही फोटोफिनिश यश देईल. एखादा शैक्षणिक प्रश्‍न सुटेल. वादग्रस्त येणं वसूल कराल.
कन्या:
प्रेमविवाहात प्रगती ता. 24 व 25 ऑक्‍टोबर हे दिवस पौर्णिमेची शक्तिस्पंदनं खेचूनच घेणारे. तरुण-तरुणींना ऑनलाइन क्‍लिक होणारे दिवस. व्हिसा मिळेल. परदेशस्थ तरुणांना मोठा लाभ. हस्त नक्षत्राचं "गीत गाता चल' होईल. नोकरीच्या संधी, प्रेमविवाहात प्रगती. चित्रा नक्षत्राची कर्ज मंजुरी.
तूळ:
परदेशात नोकरीसाठी व्हिसा रवी-शुक्र योगाची पार्श्‍वभूमी बोनस शेअर्स देणारी. स्वाती नक्षत्राच्या तरुणांना सप्ताहात मोठं ग्रासकोर्ट राहील. जीवनातील महत्त्वाचे निर्णय घ्याल. प्रेमिकांना मोठं आत्मिक बळ देणारा सप्ताह. विशाखा नक्षत्रास परदेशात नोकरीसाठी व्हिसा मिळेल. प्रेमात पडाच!
वृश्चिक:
मोठी सरकारी कामं पौर्णिमेजवळ जीवनातली एक मोठी मॅरेथॉन जिंकणार आहात. मारा एक फायनल स्प्रिंट. अनुराधा नक्षत्रव्यक्ती सप्ताहात जीवनातले मोठे सीक्वेन्स लावणार आहेत. आई-वडिलांचं प्रेम संपादन कराल. ज्येष्ठा नक्षत्रव्यक्ती मंत्रालय हलवून सोडतील. मोठी सरकारी कामं!
धनु:
खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार पौर्णिमेजवळ मोठ्या गाठीभेटी. व्यावसायिक मंदीचं सावट जाईल. जाहिरात माध्यमांतून मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. मूळ नक्षत्रास ता. 23 व 24 ऑक्‍टोबर हे पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र एक प्रकारचा फास्ट ट्रॅक ठेवेल. झटपट कामं होतील. पूर्वाषाढा व्यक्तींचे विजयी चौकार-षटकार!
मकर:
विशिष्ट भागीदारी यशस्वी होईल राशीचा मंगळ पौर्णिमेजवळ विशिष्ट यशातून झगमगाट साजरा करेल. श्रवण नक्षत्रास रवी-शुक्र युतीयोग अफलातून फळं देईल. विशिष्ट भागीदारी यशस्वी होईल. उत्तराषाढा व्यक्तींना पौर्णिमेजवळ परदेशगमनाच्या संधी. धनिष्ठा नक्षत्रास वास्तुयोग. पुत्रपौत्रांचे विवाह ठरतील.
कुंभ:
घरात मंगलवाद्यांचे सूर सप्ताह घरात मंगलवाद्यांचे सूर काढणारा. शततारका नक्षत्रव्यक्तींस विवाहयोग. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र विशिष्ट धनलाभांची परंपरा ठेवेल. नवपरिणीतांना हा कौजागरी पौर्णिमेचा सप्ताह जीवनात मोठा सुखावणारा. पूर्वाभाद्रपदा व्यक्तींना खूप मोकळं मोकळं वाटेल.
मीन:
आर्थिक कोंडी फुटेल रेवती नक्षत्रव्यक्ती सप्ताहात धमाल करतील. व्यावसायिक आर्थिक कोंडी फुटेल. ओळखीमध्यस्थी फलद्रूप होतील. उत्तराभाद्रपदा व्यक्तींना पौर्णिमेचं फिल्ड जरा घातकच. प्रवासात जपा. स्त्रीवर्गाशी जपूनच रहा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रास ता. 26 ची शुक्रवार संध्याकाळ मोठ्या मौजमजेची.

ताज्या बातम्या