भविष्य

मेष:
प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
वृषभ:
सार्वजनिक कामात यश लाभणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी लाभेल.
मिथुन:
आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. वरिष्ठांबरोबर चांगले संबंध राहणार आहेत. प्रॉपर्टीचे व गुंतवणुकीचे व्यवहार टाळावेत.
कर्क:
मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. शासकीय कामात अडचणी जाणवणार आहेत. वरिष्ठांशी संबंध बिघडणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
सिंह:
कोणाला जामीन राहू नका किंवा कोणाला उसनवार पैसे देऊ नका. प्रॉपर्टीच्या संदर्भातील शुभ कामे दुपारी 11 नंतर करावीत.
कन्या:
मित्रांच्याकडून फसवणुकीची शक्‍यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
तूळ:
शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना यश लाभेल. अडचणीवर मात कराल. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
वृश्चिक:
नोकरीत समाधानकारक स्थिती राहणार आहे. नवीन परिचय होतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.
धनु:
व्यवसायात साहस शक्‍यतो टाळावे. कोणतेही टोकाचे निर्णय नकोत. नातेवाइकांशी मतभेदाची शक्‍यता आहे.
मकर:
कर्ज प्रकरणे मंजूर होतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार आहे. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल.
कुंभ:
कर्मचारीवर्गाबरोबर संबंध बिघडण्याची शक्‍यता आहे. मौल्यवान वस्तूंकडे किंवा कागदपत्रांकडे विशेष लक्ष द्यावे.
मीन:
मानसिक प्रसन्नता लाभेल. कोणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका. प्रॉपर्टीचे, गुंतवणुकीचे व्यवहार कटाक्षाने टाळावेत.
रविवार, फेब्रुवारी 17, 2019 ते शनिवार, फेब्रुवारी 23, 2019
मेष:
मोठी चिंता दूर होईल कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाची सुरवात आश्‍वासक राहील. मोठी चिंता दूर होईल. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात आध्यात्मिक प्रचीती येईल. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 19 व 20 हे दिवस नोकरीतल्या घटनांद्वारे अतिशय शुभसूचक. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींचा शुक्र-शनी शुभ योगातून व्यावसायिक उत्कर्ष. परिचयोत्तर विवाह.
वृषभ:
सामाजिक प्रतिष्ठा लाभेल हा सप्ताह पौर्णिमेच्या आसपासच्या काळात तरुण-तरुणींना ऑनलाईन क्‍लिक होणारा. नोकरीचे कॉल येतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींचा व्हिसा येईल. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना सामाजिक पत-प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाशी निगडित असलेली सरकारी कामं होतील. एखादा भूखंड सोडवाल. वास्तुविषयक हालचाली. घरात नातवंडाचं आगमन. हृद्य धार्मिक उत्सव होतील.
मिथुन:
आध्यात्मिक विश्वात रमाल सप्ताहातली पौर्णिमा शुभग्रहांची ताकद वाढवेल. शुक्र-शनी योगातून जीवनातला एक सुंदर अध्याय सुरू होईल. कलाकारांना मोठे भव्य-दिव्य लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरीचा लाभ. चॅटिंगचं प्रेमप्रकरणात रूपांतर होईल! पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती एका मोठ्या आध्यात्मिक मनोविश्वात राहतील. उपरती होईल. गीतेचा अर्थ कळेल!
कर्क:
तरुणांना स्पर्धा परीक्षांत यश पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासचा काळ मानसिक पातळीवरून प्रतिकूल. विशिष्ट कायदेशीर प्रश्‍नांतून त्रास. दहशतीनं वागणाऱ्या व्यक्तीचं मनावर दडपण राहील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाच्या शेवटी विजयी वाटचाल. स्वभावात आमूलाग्र बदल घडतील. तरुण-तरुणींना स्पर्धात्मक यशातून लाभ. मुलाखती उत्तम होतील.
सिंह:
नोकरीच्या संधीवर लक्ष ठेवा पौर्णिमेच्या आसपासच्या काळात "मॅन ऑफ द मॅच' व्हाल. नोकरीच्या संधीवर लक्ष ठेवून राहा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 19 व 20 हे दिवस "टेक ऑफ' करून देणारे. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात जीवनातलं सुंदर वळण येईल. नवपरिणितांचं जीवन मार्गी लागेल.
कन्या:
सरकारी कामं मार्गी लागतील चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासच्या काळात अचानक मोठा धनलाभ. नूतन वास्तूत प्रवेश. सरकारी कामं मार्गी लागतील. एखादा गॉडफादर भेटेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र अन्नपाण्यातल्या संसर्गाचं. पित्तप्रकोप. शनिवारी कुटुंबकलहाची शक्‍यता. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना चोरी-नुकसानीचं भय.
तूळ:
हितोपदेशकांचा सहवास शुक्र-शनी योगाचं पॅकेज या सप्ताहावर प्रभाव टाकेल. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात सज्जनांना काही लाभ होतील. चित्रा नक्षत्राच्या तरुणांचं औदासीन्य जाईल. हितोपदेशक सहवासात येतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींचा गुरुवार विलक्षण प्रवाही राहील. व्यावसायिक भाग्यबीजं पेरली जातील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टात यश.
वृश्चिक:
घरात मंगलकार्यं ठरतील ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह पर्वणीसारखा. मोठा धनलाभ. पौर्णिमेजवळ विशिष्ट करारमदार. घरात मंगलकार्यं ठरतील. तरुणांना जीवन सहचरीचा लाभ. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचा पूर्ण चंद्रमा देव-देवतांचा अनुग्रह देईल. नोकरीत स्थान बळकट होईल. परदेशगमनाची संधी.
धनु:
संशोधनाला गती मिळेल राशीतल्या शुक्र-शनी सहयोगातून पौर्णिमा पूर्वसुकृतातून लाभ देणारी. तरुण-तरुणींचं नैराश्‍य जाईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींचा विवेक जागृत होऊन उत्तम निर्णय घेतले जातील. संशोधनाला वा विशिष्ट शैक्षणिक उपक्रमाला गती मिळेल. शैक्षणिक व्हिसा मिळेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना "छप्पर फाड के' काही मिळणार आहे.
मकर:
विलक्षण संधींचा लाभ हा सप्ताह गुरुभ्रमणाची ताकद वाढवणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना काही विलक्षण संधी अपेक्षित आहेत. सप्ताहाचा शेवट नोकरीत शुभदायी. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट ब्रेक्रिंग न्यूज अर्थातच सुवार्ता देईल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना भूखंड मिळेल. कोर्टात यश.
कुंभ:
तारुण्य फुलण्याचा काळ पौर्णिमेचं उधाण राहील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती या उधाणाचा सर्वाधिक लाभ घेतील. तरुणांचं शिक्षण, नोकरी वा विवाह आदींबाबतचे प्रश्‍न सुटतील. ता. 19 ते 21 हे दिवस चंद्रबळातून जीवनात मोठी रसद पुरवणारे. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचं तारुण्य फुलेल. कलाकारांना लाभ.
मीन:
जीवनाचं तत्त्वज्ञान कळेल! सुगीचा हंगाम सुरू झालाच आहे. रेवती नक्षत्राच्या व्यक्ती प्रत्येक बाबतीत पुढाकार घेतील. ता. 20 व 21 हे दिवस चंद्रबळातून अमृतस्पर्श करतील. जीवनाचं तत्त्वज्ञान पूर्णपणे कळून येईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती पौर्णिमेच्या आसपासच्या काळात चैन-चंगळ, मौज-मजा करतील.

ताज्या बातम्या