भविष्य

मेष:
मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल. ग्रहमान सामान्य आहे. फार मोठे यश लाभणार नाही.
वृषभ:
प्रगती वेगाने होणार आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल.
मिथुन:
व्यवसायाची उलाढाल वाढेल. काहींना नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. शासकीय कामात यश मिळेल.
कर्क:
सांस्कृतिक व सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरीत अत्यंत चांगली स्थिती राहील. व्यवसाय वाढेल.
सिंह:
आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. कर्तृत्त्वाला संधी लाभणार आहे. तुमच्यावर एखादी जबाबदारी सोपवली जाईल.
कन्या:
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. शासकीय कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत.
तूळ:
वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. तुमच्या सभोवतालच्या लोकांचा तुमचावर प्रभाव पडणार आहे. थोरामोठ्यांचा विश्‍वास संपादण्यात यशस्वी व्हाल.
वृश्चिक:
नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.
धनु:
साडेसातीची तीव्रता जाणवणार आहे. कामे विलंबाने होणार आहेत. प्रवासात काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे.
मकर:
कर्तृत्त्वाला संधी लाभेल. कौटुंबिक जीवनात सौख्य राहणार आहे. विवाहेच्छुंचे विवाह जमतील.
कुंभ:
वरिष्ठांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. अडचणीवर मात कराल.
मीन:
तुमच्या कामात तुम्ही सफलता प्राप्त करू शकाल. थोरामोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. सार्वजनिक कामात यश लाभणार आहे.
रविवार, एप्रिल 21, 2019 ते शनिवार, एप्रिल 27, 2019
मेष:
दुखापतींची काळजी घ्या राशीतला रवी-हर्षल योग व्यूहरचना करणारा. वृद्धांनी दुखापतींपासून सावध राहावं. सप्ताहाचा शेवट उत्सव-समारंभातून बेरंगाचा. बाकी, अश्‍विनी नक्षत्राच्या तरुणांना सप्ताहाची सुरवात अतिशय आश्‍वासक. ओळखी-मध्यस्थीतून लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना उष्माघाताच्या त्रासाची शक्‍यता. सोमवार पित्तप्रकोपाचा.
वृषभ:
पालकांशी वाद नकोत रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती जीवनातले विजयी चौकार-षटकार मारतील. ता. 22 व 23 हे दिवस अजब फळं देतील. विवाहविषयक निर्णय घ्याल. बाकी, राशीचा मंगळ मृग नक्षत्राच्या व्यक्तींना कायदेशीर गोष्टींतून त्रासदायक. आई-वडिलांशी वाद होण्याची शक्‍यता. रागावर नियंत्रण ठेवा.
मिथुन:
भावनोद्रेक होऊ देऊ नका ग्रहांची समीकरणं तीव्र स्वरूपाची वाटतात. कोणताही भावनोद्रेक टाळा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना विचित्र प्रसंगांना सामोरं जावं लागू शकेल. ता. 24 व 25 हे दिवस प्रचंड मानसिक गोंधळाचे असतील. काळजी घ्या. जीवनात निरासक्त बनण्याचा प्रयत्न करा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना जाहिरातमाध्यमातून लाभ. खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील.
कर्क:
प्रसिद्धीच्या झोतात याल या सप्ताहात आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात येतील. ता. 22 व 23 या दिवशी शुभग्रहांद्वारे काही चांगलं घडेल. भूखंड सोडवून घ्या. सप्ताहाच्या शेवटी नातेवाइकांशी जपून वागा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींचं नोकरीच्या माध्यमातून परदेशगमन. मात्र, देण्या-घेण्याचे व्यवहार जपून करा.
सिंह:
स्वतंत्र व्यावसायिकांना लाभ या सप्ताहातलं ग्रहमान संमिश्र स्वरूपाचं राहील. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठ्या स्वरूपाचे लाभ. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अपवादात्मक लाभ होतील; मात्र राजकारणी व्यक्तींचा संपर्क नको. नवं शत्रुत्व उद्भवू शकतं. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सार्वजनिक जीवनात गैरसमजांना सामोरं जावं लागण्याची शक्‍यता.
कन्या:
स्त्रीच्या भावना दुखवू नका उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना तीव्र अशा ग्रहमानातून विशिष्ट शारीरिक वेदनांना सामोरं जावं लागेल. बाकी, हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना बुध-शुक्र मंद मदं सुगंधाच्या लहरींचा अनुभव देतच राहतील. सहवासातल्या स्त्रीला दुखवू नका. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारची संध्याकाळ गुप्तचिंतेची. खलनायकाचा त्रास! काळजी घ्या.
तूळ:
सरकारी कामांत यश ग्रहांची फील्डिंग प्रचंड टाईट राहील. आजूबाजूच्या मानवी काटेरी झाडांपासून सावध राहा! चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ओरखडे बसू शकतात. उत्सव-समारंभातून गॉसिपिंग टाळा. स्वाती नक्षत्राच्या स्वतंत्र व्यावसायिकांना सरकारी कामांतून यश. बुधवार अतिशय शुभ. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रविरोधाला सामोरं जावं लागेल.
वृश्चिक:
मानसिक कोंडमारा संपेल सप्ताहात ज्येष्ठा नक्षत्रात गुरूचं आगमन होईल. एखादा मानसिक कोंडमारा संपेल. तरुणांची उमेद वाढेल. विशिष्ट स्पर्धा परीक्षेतून यश मिळेल. शुभग्रहांची मंत्रालयं साडेसातीतसुद्धा तुमच्यासाठी 24x7 उघडी राहतील. और क्‍या! अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती जीवनाचा सुंदर किनारा गाठतील.
धनु:
व्यवहार चोख ठेवा सप्ताहात साडेसातीतलं एक ऑडिट सुरू होत आहे. तुमचे व्यवहार चोख ठेवा. सहवासातल्या स्त्रीशी जपून वागा. बाकी, पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 23 व 24 हे दिवस अतिशय सुंदर. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहांचं ऑडिट सतावेल. घाबरू नका. यशस्वीरीत्या पार पाडाल. डोळ्यांची काळजी घ्या.
मकर:
कलाकारांचा भाग्योदय हा सप्ताह ग्रहांच्या "टाईट फील्डिंग'चा! नका काढू चोरट्या धावा! उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींवर ग्रहांची कडक नजर राहील. बाकी, हा काळ श्रवण नक्षत्राच्या कलाकारांच्या भाग्योदयाचा आहे. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात कायदेशीर कटकटींना सामोरं जावं लागण्याची शक्‍यता. त्वचाविकार होण्याची शक्‍यता. काळजी घ्या.
कुंभ:
संशयास्पद वागू नका ग्रहांचा पट ताब्यात घेण्याचा प्रयत्न मंगळ करेल. घरातले वाद टाळा. सार्वजनिक जीवनात संशयास्पद वागू नका. बाकी, शततारका नक्षत्राच्या व्यक्ती एकूणच सुरक्षित राहतील. मात्र, धनिष्ठा आणि पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी काहीसा असुरक्षिततेचा काळ. आहार-विहारादी पथ्य पाळाच.
मीन:
मानसिक गोंधळ संपेल सप्ताहात गुरू भाग्यात येत आहे. मानसिक गोंधळ संपेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात शुभग्रहांचा लाभ घेता येईल. ता. 23 व 24 हे दिवस शुभग्रहांच्या उत्तम पॅकेजचे! पुन्हा रिचार्ज व्हाल! प्रवासात काळजी घ्या. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना घरातल्या पाहुण्यांची चिंता राहील.

ताज्या बातम्या