Horoscope - 02/20/2019 - 00:05

Horoscope - 02/20/2019 - 00:05

दैनंदिन जीवनात गतिमानता येईल. आपण वेगळे काहीतरी करावे अशी उर्मी तयार होईल. अनेकांशी सुसंवाद साधाल.

व्यवसायाची उलाढाल वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमचे वरिष्ठांशी चांगले संबंध राहणार आहेत.

थोरामोठ्यांचे मार्गदर्शन मिळेल. सल्ला उपकारक ठरणार आहे. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे.

ग्रहांची फारशी साथ नाही. आत्मविश्‍वासच्या जोरावर दैनंदिन कामे पार पाडाल. अडचणीवर मात कराल.

गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. कामाचा ताण जाणवेल. नवे परिचय होतील.

थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. नोकरीत वरिष्ठांशी जुळवून घेणे योग्य ठरेल. व्यवसायात अडचणी जाणवणार आहेत.

बाजारपेठेचा अभ्यास करून शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. चित्रपट क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.

ग्रहांची अनुकूलता चांगली असल्यामुळे हाती घेतलेली कामे मार्गी लागणार आहेत. पावले योग्य दिशेने चालणार आहेत.

नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल. वैवाहिक जीवनात सामान्य स्थिती राहणार.

उधारी, उसनवारी वसूल होईल. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष लाभ होणार आहे. नको त्या व्यक्‍तींसाठी खर्च कराल.

व्यवसायात चांगले वातावरण दिसून येईल. नोकरीतही वातावरण चांगले राहणार आहे. उत्साह, उमेद वाढेल.

वैवाहिक जीवनात तीव्र मतभेदाची शक्‍यता आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना अडचणीं जाणवणार आहेत. आरोग्य चांगले राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com