भविष्य

मेष:
आरोग्य चांगले राहणार आहे. प्रवास सुखकर होतील. येणारा दीड महिना आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगला जाणार आहे.
वृषभ:
अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. वैवाहिक जीवनात सुधारणा होणार आहे. आर्थिक आवक मनासारखी होईल.
मिथुन:
बौद्धिकक्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळणार आहे. आगामी महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. संततिसौख्य लाभेल.
कर्क:
स्वास्थ्य लाभेल. मुलामुलींची प्रगती होईल. सार्वजनिक क्षेत्रात भरभरून यश मिळेल.
सिंह:
कर्तृत्त्वाला संधी मिळेल. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे.
कन्या:
कला क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर यश लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात एक वेगळी उंची गाठू शकाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
तूळ:
उत्साह, उमेद वाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.
वृश्चिक:
महत्त्वाची व शुभ कामे नकोत. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.
धनु:
महत्त्वाचे निर्णय नकोत. मुलामुलींच्याकरिता जदा खार्च करावा लागेल. मनोरंजनावर अधिक खर्च कराल.
मकर:
व्यवसायाची उलाढाल वाढेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
कुंभ:
व्यवसायात मनासारखे वातावरण राहील. राजकारणात यश मिळेल. चुकीच्या व्यक्‍तींसाठी खर्च करत नाही ना याकडे लक्ष द्यावे.
मीन:
महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. वैवाहिक जीवनात मतभेद वाढणार आहेत. प्रॉपर्टीचे व्यवहार नकोत.
रविवार, मार्च 24, 2019 ते शनिवार, मार्च 30, 2019
मेष:
न्यायालयविषयक कामं सप्ताह अश्‍विनी नक्षत्रास शुभग्रहांच्या पाठबळाचा. ता. 27 ते 29 मार्च हे दिवस अतिशय गतिमान. न्यायालयविषयक कामं. तरुणांना परदेशी व्हिसा. भरणी नक्षत्रव्यक्तींना सप्ताहाची सुरवात संसर्गजन्य. गर्दीची ठिकाणं टाळा. पाकीट जपा. दस्तऐवज जपा.
वृषभ:
गर्दीचा प्रवास टाळा राशीतलं मंगळाचं आगमन दखलपात्रच. भाजण्या-कापण्यापासून जपा. सार्वजनिक ठिकाणी बाचाबाची नको. कृतिका नक्षत्रव्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली येत आहेत. मृग नक्षत्रास सप्ताहाचा शेवट विशिष्ट अपवादात्मक स्थितीतून लाभ देईल. मात्र, गर्दीचा प्रवास टाळा. स्त्रीशी गैरसमज होतील.
मिथुन:
नोकरीत भाग्योदय सप्ताह नावीन्यपूर्ण असाच राहील. परदेशस्थ तरुणांना लाभ होतील. मृग नक्षत्रास ता. 27 ते 29 मार्च हे दिवस जीवनातला प्युअर सीक्वेन्स लावणारे. ता. 25 ची रंगपंचमी आर्द्रा नक्षत्रास मोठी रंजक. नोकरीत भाग्योदय. स्त्रीमुळे लाभ. कलाकारांचं परदेशगमन. पुनर्वसू नक्षत्रास शनिवार दुष्ट संपर्काचा.
कर्क:
संकटातून बाहेर पडाल सप्ताह बुधाच्या विशिष्ट स्थितीतून प्रदूषणाचा. अन्नपाण्यातला संसर्ग शक्‍य. रंगपंचमीच्या दिवशी रंगाचा बेरंग नको. ता. 27 व 28 हे दिवस आश्‍लेषा नक्षत्रास अप्रतिम. विशिष्ट संकटातून बाहेर पडाल. पुष्य नक्षत्रास सप्ताह एखादी भातृचिंता सतावेल.
सिंह:
कायदेशीर कटकटी सप्ताह स्त्रीवर्गास व्याकुळ करणारा. नका बनू चिंतातूर जंतू. मघा नक्षत्रव्यक्तींना सप्ताहाची सुरवात यंत्र, उपकरण वा कामगार इत्यादींतून उपद्रव देणारी. बाकी उत्तरा नक्षत्रास सप्ताहाचा शेवट कायदेशीर कटकटीचा. पूर्वा नक्षत्रास गुरुवार भन्नाट. परदेशगमन.
कन्या:
तरुणांचं परदेशगमन शक्‍य सप्ताह बुधाच्या स्थितीतून प्रदूषणाचा. आहारविहारातून पथ्यं पाळा. कायदेशीर बाबी बघा. बाकी ता. 27 ते 29 हे दिवस उत्तरा आणि हस्त नक्षत्रास व्यावसायिक लाभ देणारे. चित्रा नक्षत्रास ता. 28 चा गुरुवार विक्रमी. तरुणांचं परदेशगमन. मात्र, स्त्रीचे संमोहन टाळा.
तूळ:
नोकरीत कौतुक सप्ताह वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर खराब. न्यायालयीन प्रकरण जपून हाताळा. बाकी स्वाती नक्षत्राच्या तरुणांना सप्ताहात सुंदरच ग्रहमान. ता. 27 ते 29 मार्च हे दिवस एकूणच अफलातून. नोकरीत कौतुक. विशाखा नक्षत्रास सप्ताहाचा शेवट बुधाच्या पार्श्‍वभूमीवर उगाचच व्याकुळ करणारा. लोकापवादातून त्रास.
वृश्चिक:
मानसिक पर्यावरण बिघडेल विशाखा नक्षत्रास मंगळ भ्रमणाची पार्श्‍वभूमी आजूबाजूचं मानसिक पर्यावरण बिघडवणारी. श्‍वासोच्छ्वासांचा उष्मा वाढेल. बाकी अनुराधा नक्षत्रव्यक्ती सप्ताहात चांगलीच रंगपंचमी साजरी करतील. कलंदर व्यक्ती जीवनात येतील. ज्येष्ठा नक्षत्रास गुरुवार गुरू-प्रचितीचा.
धनु:
नवपरिणीतांचं नैराश्‍य जाईल सप्ताह आपल्या राशीस अपवादात्मक ग्रहमानाचा. काहींना पूर्वसंचितातून उत्तम लाभ होतील. गुरुभक्तांना सप्ताह चांगला. मूळ नक्षत्रास ता. 27 ते ता. 29 हे दिवस दैवी प्रचिती देतील. नवपरिणीतांचं नैराश्‍य जाईल. पूर्वाषाढा नक्षत्रास ता. 26 चा मंगळवार गाठीभेटींतून वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता. शनिवार स्त्रीविरोधी.
मकर:
सार्वजनिक जीवनात संयम पाळा धनिष्ठा नक्षत्रास सप्ताह अपवादात्मक ग्रहपार्श्‍वभूमीचा. खर्चाला तोंड फुटेल. सार्वजनिक जीवनात संयम पाळा. बाकी सप्ताहाची सुरवात उत्तराषाढा नक्षत्रास व्यावसायिक मोठ्या प्राप्तीची. वास्तुविषयक व्यवहार जपून करा. ता. 29 व 30 हे दिवस एकूणच आपल्या राशीस मानवी उपद्रवाचे.
कुंभ:
चॅटिंग करताना सावध काही भक्कम ग्रहसमीकरणं होत आहेत. काहींना अपवादात्मक असे लाभ होतील. शततारका नक्षत्रव्यक्ती यात मोडतात. ता. 27 ते 29 हे दिवस काही भव्यदिव्य घडवणारे. तरुणांनो संधीचा लाभ घ्याच. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रास बुधाची स्थिती गोंधळात टाकणारी. कुसंगत टाळा. चॅटिंग करताना सावध.
मीन:
वास्तुविषयक व्यवहार जपून करा रेवती नक्षत्रव्यक्ती विशिष्ट अपवादात्मक परिस्थितीचा लाभ घेतील. ता. 27 ते 29 हे दिवस चमत्कारिक; पण शुभ. मात्र, वास्तुविषयक व्यवहार करताना जपून. तरुणांना सप्ताहात जीवनातील सर्वोत्तम संधी. उत्तराभाद्रपदा नक्षत्रास ता. 25ची रंगपंचमी सुवार्तांतून जल्लोषाची. व्हिसा मिळेल.

ताज्या बातम्या