भविष्य

मेष:
शैक्षणिक व बौद्धिक कार्यात यश मिळेल. शासकीय कामे मार्गी लागतील. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
वृषभ:
तुमचे निर्णय अचूक ठरतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. आरोग्य चांगले राहणार आहे.
मिथुन:
शासकीय कामात यश लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी लाभेल.
कर्क:
नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. मनोरंजनाकडे कल वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे.
सिंह:
काहींना नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. वरिष्ठांचे चांगले सहकार्य लाभणार आहे.
कन्या:
प्रसन्नता लाभेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. काहींना प्रवासाचे योग येतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल. जबाबदारी वाढेल.
तूळ:
मनोरंजनाकरिता जादा खर्च कराल. थोरामोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे.
वृश्चिक:
मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. कलेच्या व बौद्धिक क्षेत्रात विशेष यश मिळेल.
धनु:
व्यवसायात विशेष प्रगती होईल. प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. तुमचे स्वतःचे निर्णय बरोबर येणार आहेत.
मकर:
अपेक्षित गाठीभेटी होतील. सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी लाभेल. नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
कुंभ:
काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
मीन:
मानसिक प्रसन्नता लाभेल. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.
रविवार, एप्रिल 14, 2019 ते शनिवार, एप्रिल 20, 2019
मेष:
संधीसाठी दबा धरून बसा! अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती रवी-गुरू शुभयोगाचा तत्काळ लाभ घेतील. तरुणांनो, संधीसाठी दबा धरून बसा! नका गुंतू उगाच प्रेमप्रकरणात. ता. 14 ते 16 हे दिवस तुम्हाला भरारी घ्यायला लावणारे. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार प्रलोभनात अडकवणारा. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या आसपासच्या काळात प्रवास करताना काळजी घ्यावी.
वृषभ:
नोकरीच्या मुलाखतीला यश कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना बुध-शुक्रांची विशिष्ट स्थिती ता. 17 व 18 या दिवसांत जबरदस्त क्‍लिक होणारी. नोकरीच्या मुलाखतीला यश. व्हिसा मिळेल. मंगळाची नक्षत्रगत स्थिती पाहता रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती प्रेमात पडतील....मात्र, पोरी जरा जपून! मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र संसर्गजन्य. पैशाचं पाकीट जपा.
मिथुन:
कलंदर माणसं भेटतील बुध-शुक्र यांची जोडगोळी पौर्णिमेच्या या सप्ताहात मोठी धमाल करेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 17 ते 19 हे दिवस प्रेमसंजीवनी देणारे. कलंदर माणसं भेटून जीवनात जान येईल! आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार वाहनांसंदर्भात घातक. नका तोडू सिग्नल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा आध्यात्मिक प्रचीतीची.
कर्क:
वाहन जोरात चालवू नका सप्ताहातील वेगवान रास. पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती सर्वांचं लक्ष वेधून घेतील. ता. 15 व 16 हे दिवस सर्व प्रकारे उत्तम. काहींना राजकीय लाभ. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या सन्मानाचे योग. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या आसपासच्या काळात वाहन चालवताना काळजी घ्यावी. वेगावर नियंत्रण ठेवावं. घाटात काळजी घ्यावी.
सिंह:
मोठ्या आर्थिक उलाढाली मघा नक्षत्राच्या व्यक्तींना दिव्य शक्तींचा लाभ देणारं ग्रहमान. काहींना पौर्णिमेच्या आसपासच्या काळात नक्षत्रलोकांतून लाभ! ता. 15 व 16 हे दिवस अफलातून राहतील. व्हिसासाठी मुलाखती द्या. सप्ताहात पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींच्या मोठ्या आर्थिक उलाढाली होतील. पौर्णिमा ग्लॅमर देणारी! सेलिब्रिटींचा सहवास लाभेल.
कन्या:
मोठ्या धनलाभाची शक्‍यता बुध-शुक्र जोडगोळी मोठ्या खेळी करेल. एखादा धनलाभ जीवनातली सगळी मरगळ घालवेल. ता. 17 व 18 हे दिवस तुमच्या राशीसाठी भन्नाटच राहतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती पूर्वसंचितातील ट्रॅव्हलर चेक्‍स कॅश करतील! पौर्णिमेच्या आसपासच्या काळात हस्त नक्षत्राच्या व्यक्ती प्रिय व्यक्तींबरोबर प्रवास करतील. रोमान्स करतील.
तूळ:
गिर्यारोहकांनी काळजी घ्यावी मंगळभ्रमण उगाचच उतावीळ करणारं. गिर्यारोहकांनी जपावं. थट्टा-मस्करी टाळावी. बाकी, चित्रा नक्षत्राच्या तरुणांना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र अतिशय शुभ. विवाहाचा निर्णय घ्याल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तीची व्यावसायिक धनचिंता बुधवारी दूर होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा पित्तकोपाची. नका फिरू उन्हात.
वृश्चिक:
गाठी-भेटींतून प्रभाव टाकाल सप्तमस्थ मंगळभ्रमण एखादा नैतिक विजय मिळवून देईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 15 व 16 हे दिवस अतिशय सुसंगत राहतील. गाठी-भेटींतून प्रभाव टाकाल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींचं संकटविमोचन होईल. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात विचित्र खर्च करावा लागण्याचे प्रसंग ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींवर येतील.
धनु:
उपासना फलदायी होईल मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात नक्षत्रलोकातून लाभ होईल! उपासना फलदायी होईल. ता. 15 व 16 हे दिवस अद्भुत फळं देतील. घरात सुवार्तांचा भर राहील. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात शुभ ग्रहांची मोठी साथ राहील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासच्या काळात एखादी भ्रातृचिंता सतावेल. प्रवासातल्या व्यक्तींची चिंता राहील.
मकर:
नोकरीत प्रशंसा होईल पौर्णिमेच्या या सप्ताहात शुभ ग्रहांच्या विशिष्ट स्थितीतून लाभ होईल. सप्ताहात चंद्रबळ प्रचंड राहून पौर्णिमेच्या आसपासच्या काळात विजयोत्सव साजरा कराल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती फॉर्ममध्ये येतील! श्रवण नक्षत्राच्या तरुणांची मरगळ जाईल. नोकरीत प्रशंसा होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती पुत्रोत्कर्षामुळे धन्यता अनुभवतील.
कुंभ:
नव्या नोकरीत स्थिर व्हाल राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये सध्या तुम्ही गोपनीयरीत्या लाभ घेत आहात! शुभ ग्रहांची अशीच गोपनीय मदत या सप्ताहात तुम्हाला मिळत राहणार आहे. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा धनलाभ अपेक्षित आहे. सप्ताहात नव्या नोकरीत स्थिर व्हाल. सोमवार विलक्षण असेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती पौर्णिमेच्या आसपासच्या काळात उत्सव-समारंभाची मजा लुटतील.
मीन:
प्रेमिकांना टेलिपथीचा अनुभव! राशीतील बुध-शुक्र पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या खेळी करतील. काहींना नोकरीत अचानक बढती. प्रेमिकांची टेलिपथी प्रचंड ऍक्‍टिव्ह होईल! उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती मोहरतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचा पौर्णिमेच्या आसपास मान-सन्मान होईल. सरकारी अनुदानातून लाभ. ग्रीनकार्ड मिळेल.

ताज्या बातम्या