भविष्य

मेष:
धार्मिक कार्याकरिता खर्च कराल. सामाजिक उपक्रमाकडे तुमचे लक्ष वेधले जाईल. नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे.
वृषभ:
प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. काहींना नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे.
मिथुन:
शासकीय कामात यश लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. नोकरी, व्यवसायात उत्तम प्रगती होईल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. गुंतवणुकीला व प्रॉपर्टीला दिवस चांगला आहे.
कर्क:
तुम्ही सर्व क्षेत्रात आघाडी घेऊ शकाल. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. कर्तृत्वाला संधी लाभेल. तुम्ही आपल्या कामाचा ठसा उमटविण्यात यशस्वी व्हाल. प्रवासाचे योग येतील.
सिंह:
नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. उत्साह, उमेद वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभणार आहे. काहींना नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. व्यवसायात धाडस टाळावे.
कन्या:
शासकीय कामे पुढे ढकलावीत. जबाबदारी वाढेल. कामाचा ताण व दगदग वाढेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. मनोरंजनाकडे कल वाढेल. कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.
तूळ:
वरिष्ठांची कृपा लाभेल. नोकरीत अत्यंत चांगली स्थिती राहील. तुम्हाला अनेकांची मदत मिळणार आहे. कामामध्ये उत्साह राहणार आहे. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
वृश्चिक:
आरोग्य चांगले राहील. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. तसेच प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना आर्थिक लाभ होतील. विद्यार्थ्यांना सुयश मिळेल. नवे स्नेहसंबंध जुळतील.
धनु:
आर्थिक प्रश्‍नाच्या संदर्भात चांगली घटना घडेल. शासकीय कामे मार्गी लागतील. आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. प्रवास सुखकारक होतील.
मकर:
तुमचा प्रभाव वाढणार आहे. कर्तृत्वाला संधी मिळेल. व्यवसायाकडे विशेष लक्ष द्याल. उत्साह वाढणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. नवा मार्ग दिसेल, नवी दिशा सापडेल.
कुंभ:
आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगली घटना घडेल. नवे हितसंबंध प्रस्थापित कराल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील.
मीन:
वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. सर्व क्षेत्रात जबाबदारी वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. शत्रूपिडा नाही. अडचणीवर मात कराल. मनोरंजनाकडे कल वाढेल.
रविवार, एप्रिल 21, 2019 ते शनिवार, एप्रिल 27, 2019
मेष:
दुखापतींची काळजी घ्या राशीतला रवी-हर्षल योग व्यूहरचना करणारा. वृद्धांनी दुखापतींपासून सावध राहावं. सप्ताहाचा शेवट उत्सव-समारंभातून बेरंगाचा. बाकी, अश्‍विनी नक्षत्राच्या तरुणांना सप्ताहाची सुरवात अतिशय आश्‍वासक. ओळखी-मध्यस्थीतून लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना उष्माघाताच्या त्रासाची शक्‍यता. सोमवार पित्तप्रकोपाचा.
वृषभ:
पालकांशी वाद नकोत रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती जीवनातले विजयी चौकार-षटकार मारतील. ता. 22 व 23 हे दिवस अजब फळं देतील. विवाहविषयक निर्णय घ्याल. बाकी, राशीचा मंगळ मृग नक्षत्राच्या व्यक्तींना कायदेशीर गोष्टींतून त्रासदायक. आई-वडिलांशी वाद होण्याची शक्‍यता. रागावर नियंत्रण ठेवा.
मिथुन:
भावनोद्रेक होऊ देऊ नका ग्रहांची समीकरणं तीव्र स्वरूपाची वाटतात. कोणताही भावनोद्रेक टाळा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना विचित्र प्रसंगांना सामोरं जावं लागू शकेल. ता. 24 व 25 हे दिवस प्रचंड मानसिक गोंधळाचे असतील. काळजी घ्या. जीवनात निरासक्त बनण्याचा प्रयत्न करा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना जाहिरातमाध्यमातून लाभ. खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील.
कर्क:
प्रसिद्धीच्या झोतात याल या सप्ताहात आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात येतील. ता. 22 व 23 या दिवशी शुभग्रहांद्वारे काही चांगलं घडेल. भूखंड सोडवून घ्या. सप्ताहाच्या शेवटी नातेवाइकांशी जपून वागा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींचं नोकरीच्या माध्यमातून परदेशगमन. मात्र, देण्या-घेण्याचे व्यवहार जपून करा.
सिंह:
स्वतंत्र व्यावसायिकांना लाभ या सप्ताहातलं ग्रहमान संमिश्र स्वरूपाचं राहील. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठ्या स्वरूपाचे लाभ. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अपवादात्मक लाभ होतील; मात्र राजकारणी व्यक्तींचा संपर्क नको. नवं शत्रुत्व उद्भवू शकतं. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सार्वजनिक जीवनात गैरसमजांना सामोरं जावं लागण्याची शक्‍यता.
कन्या:
स्त्रीच्या भावना दुखवू नका उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना तीव्र अशा ग्रहमानातून विशिष्ट शारीरिक वेदनांना सामोरं जावं लागेल. बाकी, हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना बुध-शुक्र मंद मदं सुगंधाच्या लहरींचा अनुभव देतच राहतील. सहवासातल्या स्त्रीला दुखवू नका. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारची संध्याकाळ गुप्तचिंतेची. खलनायकाचा त्रास! काळजी घ्या.
तूळ:
सरकारी कामांत यश ग्रहांची फील्डिंग प्रचंड टाईट राहील. आजूबाजूच्या मानवी काटेरी झाडांपासून सावध राहा! चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ओरखडे बसू शकतात. उत्सव-समारंभातून गॉसिपिंग टाळा. स्वाती नक्षत्राच्या स्वतंत्र व्यावसायिकांना सरकारी कामांतून यश. बुधवार अतिशय शुभ. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रविरोधाला सामोरं जावं लागेल.
वृश्चिक:
मानसिक कोंडमारा संपेल सप्ताहात ज्येष्ठा नक्षत्रात गुरूचं आगमन होईल. एखादा मानसिक कोंडमारा संपेल. तरुणांची उमेद वाढेल. विशिष्ट स्पर्धा परीक्षेतून यश मिळेल. शुभग्रहांची मंत्रालयं साडेसातीतसुद्धा तुमच्यासाठी 24x7 उघडी राहतील. और क्‍या! अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती जीवनाचा सुंदर किनारा गाठतील.
धनु:
व्यवहार चोख ठेवा सप्ताहात साडेसातीतलं एक ऑडिट सुरू होत आहे. तुमचे व्यवहार चोख ठेवा. सहवासातल्या स्त्रीशी जपून वागा. बाकी, पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 23 व 24 हे दिवस अतिशय सुंदर. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहांचं ऑडिट सतावेल. घाबरू नका. यशस्वीरीत्या पार पाडाल. डोळ्यांची काळजी घ्या.
मकर:
कलाकारांचा भाग्योदय हा सप्ताह ग्रहांच्या "टाईट फील्डिंग'चा! नका काढू चोरट्या धावा! उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींवर ग्रहांची कडक नजर राहील. बाकी, हा काळ श्रवण नक्षत्राच्या कलाकारांच्या भाग्योदयाचा आहे. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात कायदेशीर कटकटींना सामोरं जावं लागण्याची शक्‍यता. त्वचाविकार होण्याची शक्‍यता. काळजी घ्या.
कुंभ:
संशयास्पद वागू नका ग्रहांचा पट ताब्यात घेण्याचा प्रयत्न मंगळ करेल. घरातले वाद टाळा. सार्वजनिक जीवनात संशयास्पद वागू नका. बाकी, शततारका नक्षत्राच्या व्यक्ती एकूणच सुरक्षित राहतील. मात्र, धनिष्ठा आणि पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी काहीसा असुरक्षिततेचा काळ. आहार-विहारादी पथ्य पाळाच.
मीन:
मानसिक गोंधळ संपेल सप्ताहात गुरू भाग्यात येत आहे. मानसिक गोंधळ संपेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात शुभग्रहांचा लाभ घेता येईल. ता. 23 व 24 हे दिवस शुभग्रहांच्या उत्तम पॅकेजचे! पुन्हा रिचार्ज व्हाल! प्रवासात काळजी घ्या. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना घरातल्या पाहुण्यांची चिंता राहील.

ताज्या बातम्या