भविष्य

मेष:
कर्ज प्रकरणे मंजूर होतील. नवीन स्नेहसंबंध जुळतील. कलाकारांना संधी व प्रसिद्धी लाभेल.
वृषभ:
कौटुंबिक जीवनात प्रसन्नता लाभेल. मानसिक उत्साह वाढणार आहे. संपूर्ण दिवस आनंदात जाईल.
मिथुन:
कोणत्याही क्षेत्रात विचार करून निर्णय घ्यावेत. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. प्रवासात वस्तू हरविणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
कर्क:
दिवस अत्यंत चांगला आहे. उमेद, उत्साह वाढेल. जुने येणे वसूल होईल.
सिंह:
तुमचा दबदबा वाढेल. तुम्हाला जी संधी हवी आहे ती लवकरच मिळेल. धाडसाने कार्य कराल.
कन्या:
प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. अपेक्षित गाठीभेटी व फोन होतील.
तूळ:
व्यवसायात जबाबदारी वाढेल. नोकरीत पगारवाढीची शक्‍यता आहे. वरिष्ठांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
वृश्चिक:
एखादी भाग्यकारक घटना घडेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. कौटुंबिक जीवनात प्रसन्नता लाभेल.
धनु:
कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात यश मिळेल. तीर्थयात्रेचे योग येतील. काहींना परदेश प्रवासाचे योग येतील.
मकर:
आवडत्या व्यक्‍तींसाठी खर्च कराल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. व्यवसायात नवीन सुधारणा करू शकाल.
कुंभ:
प्रॉपर्टीसाठी, गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. लोकांचे सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
मीन:
अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. आपली कामे एक-दोन दिवसात उरकून घ्यावीत. खर्चाचे प्रमाण विशेष वाढणार आहे.
रविवार, ऑगस्ट 25, 2019 ते शनिवार, ऑगस्ट 31, 2019
मेष:
चमत्कार घडून येतील! या सप्ताहाचा सूर अतिशय सुसंगत असेल. राशीचा हर्षल मंगळ-शुक्र सहयोगाच्या पार्श्‍वभूमीवर मोठे चमत्कार घडवून आणेल. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत मोठं पॅकेज मिळणार आहे. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येचं प्रभावक्षेत्र व्यावसायिक संदर्भातून उत्तम क्‍लिक होईल. परदेशी व्यापाराची संधी.
वृषभ:
विवाहप्रस्तावांकडं लक्ष द्या अतिशय उत्तम सप्ताह. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २६ व २७ हे दिवस प्रचंड उसळी घेणारे. विवाहप्रस्तावांकडं लक्ष द्या. ज्योतिष बाजूला सारा! मृग नक्षत्राच्या व्यक्तींच्या महत्त्वाकांक्षा या सप्ताहात पूर्ण होतील. गॉडफादर भेटेल!
मिथुन:
संधींच्या श्रावणसरींचा सप्ताह या सप्ताहात संधींच्या श्रावणसरी बरसणार आहेत. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींचे जीवनातले सिक्वेन्स लागतील. ता. २६ व २७ हे दिवस मंगळ-शुक्र या ग्रहांच्या पॅकेजचे. जीवनातले शॉर्टकट्स‌ यशस्वी होतील. गुंतवणुकीतून लाभ. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींवर गुरुवारी गुरुकृपा होईल. मुला-बाळांचा भाग्योदय.
कर्क:
नोकरीतली अडचण संपेल सप्ताहात गुरुभ्रमणाचा उत्तम प्रभाव दिसून येईल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या सुरवातीला मोठे भाग्यसंकेत मिळतील. नोकरीतली अडचणीची परिस्थिती जाईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना पिठोरी अमावास्या शुभदायक. श्रीगणेशाच्या आगमनाच्या काळात एखादा वैयक्तिक भाग्योदय होईल. गणेशोत्सवाची तयारी मोठ्या उत्साहात कराल.
सिंह:
संधीसाठी दबा धरून बसा! या सप्ताहात जीवनातले प्युअर सीक्वेन्स लागतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचा शेअर वधारेल. स्त्रीवर्गाकडून लाभ होतील. अर्थात, देवता तुमच्यावर प्रसन्न राहतील. ता. २६ व २७ हे दिवस प्रचंड उसळी घेणारे. संधीसाठी दबा धरून बसा...कारण, तुम्ही सिंह आहात! अमावास्येच्या आसपासच्या काळात प्रिय व्यक्तींचा सहवास.
कन्या:
नोकरीत भाग्ययोगाचे संकेत शुभ ग्रहांच्या श्रावणसरी तुमच्यावर बरसतीलच; परंतु सार्वजनिक ठिकाणी सावधान! पर्स सांभाळा. बाकी, चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २६ व २७ हे दिवस अतिशय प्रसन्नतेचे. नोकरीत भाग्ययोगाचे संकेत. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती चैनीवर उधळण करतील. प्रेमिकांच्या गुप्त भेटी-गाठी होतील!
तूळ:
व्यवसायात तेजी येईल या सप्ताहात अनेक शुभ लाभ होतील. व्यावसायिक करारमदार होतील. व्यावसायिक तेजी उसळी घेईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षण, नोकरी व विवाह आदी घटकांसंदर्भात हा सप्ताह अतिशय शुभदायी. सतत ऑनलाईन राहा! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना तीर्थाटनाचा योग. दृष्टान्त होतील!
वृश्चिक:
नोकरीचं बोलावणं येईल हा सप्ताह विशिष्ट ऐतिहासिक फळं देईल. अनेकांचं ‘खुल जा सिम् सिम्‌’ होईल! अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासचा काळ घबाडयोगासारखी फळं देईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारचा सूर्योदय गुरुकृपेचा. नोकरीचं बोलावणं येईल. संतकृपा होईल.
धनु:
हितशत्रूंच्या कारवाया थांबतील सप्ताहातलं ग्रहमान मोठी अजब फळं देईल. ता. २६ व २७ हे दिवस विशिष्ट हुकमी यश देणारे! व्यावसायिक कौशल्य यशस्वी होईल. राजकारणी व्यक्तीला वश कराल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरी. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येचं प्रभावक्षेत्र नोकरीतल्या शुभ लक्षणांचं. हितशत्रूंच्या कारवाया बंद होतील.
मकर:
महिलांनी पर्स सांभाळाव्यात हा सप्ताह अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात संमिश्र स्वरूपाची फळं देऊ शकतो. महिलांनी पर्स सांभाळाव्यात. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी-व्यवसायासंदर्भात हा सप्ताह अत्युत्तम. गुरुवार वैयक्तिक सुवार्तांचा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचा चैनीवर मोठा खर्च होईल. मुला-बाळांचे विवाह ठरतील.
कुंभ:
परीसस्पर्श अनुभवाल! शुभ ग्रहांची स्पंदनं खेचणारी रास! शततारका नक्षत्राच्या व्यक्ती परीसस्पर्श अनुभवतील. ता. २६ व २७ या दिवशी व्यावसायिक भाग्यबीजं पेरली जातील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मोठ्या संधी. चॅटिंगमधून स्वप्नं रंगवाल! अमावास्येचं प्रभावक्षेत्र मदनबाणातून घायाळ करणारं!
मीन:
अचानक धनलाभ होईल सप्ताहाची सुरवात प्रसन्न, उबदार वातावरणात होईल. घरात मंगलमय वातावरण राहील. विवाहेच्छूंचं मंगल होईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना अचानक धनलाभाचा योग! गुरुवारचा सूर्योदय पुत्रोत्कर्षाचा. अमावास्येच्या आसपासच्या काळात पाकीट सांभाळा. स्त्रीचं संमोहन टाळा.

ताज्या बातम्या