आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 24 नोव्हेंबर 2021

पंचांग - बुधवार : कार्तिक कृष्ण ५, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय रात्री ९.५८, चंद्रास्त सकाळी १०.४७, सूर्योदय ६.४६, सूर्यास्त ५.५५, भारतीय सौर मार्गशीर्ष ४ शके १९४३.
Horoscope and Astrology
Horoscope and AstrologySakal

पंचांग -

बुधवार : कार्तिक कृष्ण ५, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय रात्री ९.५८, चंद्रास्त सकाळी १०.४७, सूर्योदय ६.४६, सूर्यास्त ५.५५, भारतीय सौर मार्गशीर्ष ४ शके १९४३.

दिनविशेष -

१९९६ - ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस असोसिएशन’चा ‘आशुतोष मुखर्जी स्मृती पुरस्कार’ ख्यातनाम अणुशास्त्रज्ञ डॉ. राजा रामण्णा यांना जाहीर.

२००० - भारत आणि चीनदरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किलोमीटर भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांनी जाहीर केले.

२००१ - महाराष्ट्राच्या माधुरी गुरनुलेने ३१ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.

२००२ - जम्मू येथील प्रख्यात रघुनाथ मंदिरावर दहशतवाद्यांचा हल्ला. तीन तासांच्या धुमश्‍चक्रीनंतर मंदिर मुक्त.

२००८ - कविवर्य मंगेश पाडगावकर यांना ‘महाराष्ट्रभूषण पुरस्कार’ प्रदान.

दिनमान -

मेष : नोकरी, व्यवसायाचा प्रश्‍न सोडवू शकाल. प्रवास सुखकर होतील.

वृषभ : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. जिद्दीने कामे पूर्ण करू शकाल.

मिथुन : आत्मविश्‍वासाच्या जोरावर कामे यशस्वी कराल. दैनंदिन कामे पूर्ण होतील.

कर्क : सौख्य व समाधान लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल.

सिंह : हितशत्रूंवर मात करू शकाल. खर्च वाढणार आहेत. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : अनेकांशी सुसंवाद साधाल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

तूळ : नोकरीमध्ये उत्तम स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील.

वृश्‍चिक : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील.

धनु : दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

कुंभ : नोकरचाकर, कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

मीन : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com