आजचे राशि भविष्य - 29सप्टेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राशि भविष्य

आजचे राशि भविष्य - 29 सप्टेंबर 2022

मेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. सुसंवाद साधाल.

वृषभ : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

मिथुन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क : काहींना प्रवासाचे योग येतील. मन आनंदी व आशावादी राहील.

सिंह : आर्थिक सुयश लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

वृश्‍चिक : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

धनू : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. संततिसौख्य लाभेल.

मकर : विरोधकांवर मात कराल. नोकरी, व्यवसायात चांगली स्थिती राहील.

कुंभ : सुसंधी लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. वादविवाद टाळावेत.