Read weekly Rashi bhavishya in marathi langauge | weekly Horoscope - 11th September 2022 to 17th September 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weekly horoscope 11th september 2022 to 17th september 2022 pjp78

साप्ताहिक राशिभविष्य (११ सप्टेंबर २०२२ ते १७ सप्टेंबर २०२२)

धनवर्षावाचा कालखंड

मेष : सप्ताह तरुणांना विवाहयोगाचा. आलेल्या विवाहस्थळांचा गांभीर्याने विचार करा. ता. १६ व १७ हे दिवस भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना धनवर्षावाचे. वसुलीतून लाभ. परिचयोत्तर विवाहयोग. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना देवदर्शन, मात्र अन्न-पाण्यातील संसर्ग जपा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून धन्यता.

चौकार-षटकार ठोकाल

वृषभ : मंगळ, शुक्राची पार्श्‍वभूमी छानच. घरात सुवार्तांची पार्श्‍वभूमी राहील. सप्ताहाचा आरंभ प्रसिद्धियोगाचा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती विजयी चौकार-षटकार ठोकतील. ता. १६ चा शुक्रवार मृग नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात भाग्योदयाचा. सप्ताहाचा आरंभ दैवी प्रचितीचा.

व्यावसायिक कामांना गती

मिथुन : मंगळभ्रमण संमिश्र स्वरूपाचं, सट्टेबाजी नको. प्रेम प्रकरणातून नाट्यं घडवणार. बाकी सप्ताह व्यावसायिक कामांतून गतिमान राहील. सुंदर प्रवास होतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ नोकरीविषयक मुलाखतीतून यश देणारा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुकृपा, पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना यंत्र वा वाहनपीडेतून त्रास.

वास्तुयोगाची शक्यता

कर्क : शुक्रभ्रमण मंगळाच्या योगात ग्रहांचं फिल्ड प्रचंड ॲक्‍टिव्ह ठेवेल. मोठा प्रवाही सप्ताह. तरुणांचा शैक्षणिक भाग्योदय. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ ऐतिहासिक अशीच शुभफळं देईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रव्यथा जाईल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग.

दुर्मिळ विवाहयोग शक्य

सिंह : मंगळ, शुक्राच्या योगाचा एक अंडरकरंट राहीलच. व्यावसायिक आर्थिक कोंडी फुटेल. एखादं वादग्रस्त येणं येईल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय लाभ. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी व्यापारातून विलक्षण लाभ. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना दुर्मीळ विवाहयोग. पितृपंधरवडा किंवा ज्योतिषी आडवा आणू नका.

व्यावसायिक कर्जमंजुरी होईल

कन्या : वक्री बुधाची स्थिती भावनाप्रधान व्यक्तींना संवेदनशील राहील, प्रिय व्यक्तींशी वाद टाळा. सप्ताहात हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत नामांकन, व्यावसायिक कर्जमंजुरी होईल. सप्ताहाचा आरंभ उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना भूखंड सोडवणारा. थोरामोठ्यांच्या मध्यस्थीतून लाभ. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह संसर्गाचा.

कलाकारांना उत्तम कालखंड

तूळ : सप्ताह विचित्र मनोव्यथा देणारा. तरुणांचे प्रेमभंग. विशाखा व्यक्तींच्या संदर्भात गैरसमज होतील. खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना जपून. बाकी सप्ताहात शुक्रभ्रमणाची नक्षत्रगत स्थिती कलाकारांना उत्तमच. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती मोठी चैन करतील. विशिष्ट पेचप्रसंगात मित्रमंडळींचं सहकार्य होईल. शनिवारी चोरीची शक्यता.

नोकरीत कर्तृत्व दाखवाल

वृश्‍चिक : सप्ताहातील मंगळ, शुक्राचा योग आपणास चांगल्या अर्थाने चर्चेत ठेवेल. नोकरीत एक मोठं कर्तृत्व दाखवाल. तरुणांची शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट अंगारकाची कृपा करणारा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचिती. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचा स्त्रीकडून गोड सन्मान.

नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील

धनू : मूळ नक्षत्रास शुभग्रहांची मंत्रालयं अनुकूलच राहतील, सतत कनेक्‍टिव्हिटी राहील. सप्ताहारंभ कौटुंबिक हृद्य समारंभाचा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींवर नोकरीत वरिष्ठांची कृपा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १३ ची अंगारकी एखादा नैतिक विजय मिळवून देईल. कलाकारांचा सन्मान.

अकल्पित लाभ होतील

मकर : सप्ताहाचा आरंभ आणि शेवट वैयक्तिक सुवार्तांचाच. नोकरीतील एखादं खटलं मिटेल. स्वतंत्र व्यावसायिकांना ता. १६ चा शुक्रवार अकल्पित लाभाचा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश, नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ नवतारुण्य देईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना अंगारकी दृष्टांताची.

व्यावसायिक अंदाजांना यश

कुंभ : मंगळ, शुक्र फिल्ड ॲरेंजमेंट करतील. प्रेमस्पंदनं खेचून घेणार आहात. ता. १३ ची अंगारकी आपलं तेज बाहेर टाकेल. नोकरीतील विशिष्ट पदाचे मानकरी व्हाल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींचे व्यावसायिक आडाखे यशस्वी होतील. ता. १६ व १७ हे दिवस विलक्षण लाभाचे.

शेअर मार्केटमधून लाभ

मीन : सप्ताहात नोकरी, व्यावसायिक पार्श्‍वभूमी छानच राहील. तरुणांची उमेद वाढवणाराच सप्ताह. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट वैयक्तिक छाप पाडणारा. विवाहविषयक गाठीभेटी कराच. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शेअर मार्केटमधून लाभ. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १६ व १७ हे दिवस विजयोत्सवाचे.

Web Title: Weekly Horoscope 11th September 2022 To 17th September 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..