Weekly Horoscope 4th june 2023 to 10th june 2023
Weekly Horoscope 4th june 2023 to 10th june 2023Sakal

साप्ताहिक राशिभविष्य (४ जून २०२३ ते १० जून २०२३)

चंद्रोदय आणि सूर्योदय यांचा संबंध उमलण्याशी आहे, त्यामुळेच चंद्रविकासी आणि सूर्यविकासी कमळं या सृष्टीत त्यांच्या भावोन्मेषांचा किंवा भावोन्मिलनांचा स्पर्श अनुभवत असतात.

वेंधळेपणा व वाद टाळा

मेष : राशीचे बुध, हर्षल वेंधळेपणातून नुकसानीचे ठरू शकतात. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी आजचा रविवार सांभाळावा. बाकी अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ५ ते ८ हे दिवस मोठे प्रवाही आणि महत्त्वाच्या कामांतून सुसंवादी. वास्तुयोग. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ जूनची संध्याकाळ मित्रमंडळींशी वादाची.

छंद आणि कलेतून वलयांकित व्हाल

वृषभ : सप्ताह प्रवासात बेरंगाचा ठरू शकतो. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह खरेदी-विक्रीतून फसण्याचा. बाकी सप्ताहाची सुरुवात रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना कला, छंद वा इतर वैयक्तिक उपक्रमांतून वलयांकित करणारी. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात मोठ्या चैन-चंगळ आणि मौज-मजेची, तसेच परिचयोत्तर विवाहयोगाची संधी.

व्यावसायिकांची मंदी दूर होईल

मिथुन : सप्ताह तरुणांना परदेशी भाग्योदय करणारा. शुक्रभ्रमण व्यावसायिकांची मंदी घालवेल. ओळखी-मध्यस्थीतून चमत्कार घडतील. ता. ५ आणि ६ हे दिवस आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट विजयोत्सव साजरा करतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह थट्टा-मस्करीतून सांभाळण्याचा. बाकी सप्ताहात नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील.

परदेशातल्या नोकरीची संधी

कर्क : सप्ताहातील बुध, हर्षल योगाची पार्श्‍वभूमी यंत्रं, वाहनं वा उपकरणांतून बेरंग करणारी. उत्सव-समारंभातून भान ठेवावं. बाकी राशीचे मंगळ, शुक्र विवाहेच्छूंना मोठे ग्रीन सिग्नल दाखवतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ७ जूनची संकष्ट चतुर्थी सुवार्तांतून चंद्रोदय पाहणारी. नोकरीत विशिष्ट भाग्योदय. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशातल्या नोकरीची संधी.

चुकीचे व्यवहार टाळा

सिंह : सप्ताहात जुगारसदृश व्यवहार टाळावेच. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींनी कोणाच्याही बहकाव्यातून व्यवहार टाळावेत. बाकी सप्ताह मघा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणातून उत्तम साथ देईल. ता. ५ आणि ६ हे दिवस मोठे चमत्कार घडवतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना व्हिसा मिळेल आणि नोकरीची निश्‍चिती होईल.

प्रवासात पैशांची काळजी घ्या

कन्या : सप्ताहात वृद्धांनी चढता-उतरताना सांभाळावं. घरातील व्रात्य लहान मुलांना सांभाळावं. प्रवासात पैशांचं पाकीट सांभाळावं. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह विचित्र मानवी उपद्रवाचा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना संकष्टी भाग्यसूचक ठरेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात मोठे आर्थिक लाभ होतील, व्यावसायिक वसुली होईल.

शैक्षणिक महत्त्वाकांक्षांना उत्तम वाव

तूळ : सप्ताह तरुणांना सर्व बाबतीत ग्रीन सिग्नल देणारा, विशेषतः स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींच्या शैक्षणिक महत्त्वाकांक्षांना उत्तम वाव देणारा ठरेल. ता. ५ ते ७ हे दिवस मोठ्या सुवार्तांची साखळी ठेवतील. विशाखा नक्षत्रास नोकरीत कर्तृत्वाला वाव देणाऱ्या घडामोडी प्रसन्न ठेवतील. सप्ताहाच्या शेवटी एखाद्या स्त्रीची दहशत अस्वस्थ करेल.

चोरी, नुकसानीपासून जपा

वृश्‍चिक : सप्ताहातील बुध, हर्षल योगाचं फिल्ड चोरी, नुकसानीपासून जपण्याचंच. सप्ताहात पोलिसांशी हुज्जत टाळा. बाकी ज्येष्ठा नक्षत्रास ता. ५ ते ७ हे दिवस मोठे व्यावसायिक लाभ घडवतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींची गुप्त चिंता जाईल. मात्र, शनिवारी दुखापतीपासून जपा.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ

धनू : मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह जुन्या गुंतवणुकीतून लाभाचा, मात्र सप्ताह प्रेमिकांचा मूड घालवू शकतो, गैरसमज टाळा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी खरेदी-विक्रीतले बहकावे टाळावेत. बाकी ता. ५ व ६ हे दिवस परदेशात भाग्योदयाचे. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सार्वजनिक गोष्टीतून सांभाळण्याचा, थट्टामस्करी नको.

न्यायालयीन कामात यश

मकर : सप्ताहातील ग्रहमान नोकरी-व्यावसायात झेप घ्यायला लावणारं. उत्तराषाढा नक्षत्राची मरगळ जाईल. ता. ७ ची संकष्टी चंद्रोदयाबरोबर भाग्योदय करणारी. श्रवण नक्षत्रास बलवत्तर विवाहयोग आहेत. ता. ७ व ८ हे दिवस स्वतंत्र व्यावसायिकांची आर्थिक कोंडी घालवतील. एखादं न्यायालयीन प्रकरण सुटेल, सरकारी कामं मार्गी लागतील. घनिष्ठा नक्षत्रास आजचा रविवार वाहनविरोधी.

व्यवसायात लाभ, वसुली होईल

कुंभ : सप्ताहातील शनी-मंगळाची पार्श्‍वभूमी आणि बुध-हर्षल योगाचं फिल्ड दुखापतींपासून जपण्याचंच. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विचित्र वेदनायुक्त व्याधी सतावू शकते. बाकी शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ५ व ६ हे दिवस व्यावसायिक लाभ घडवतील. वसुली होईल. तरुणांची शैक्षणिक चिंता जाईल. शनिवारी विद्युत उपकरणांपासून सांभाळा, गर्दीत काळजी घ्या.

गैरसमज टाळावेत

मीन : सप्ताहाचा आरंभ पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रातच होईल. सप्ताहातील शुक्रभ्रमण मोठा कार्यभाग साधेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रास सतत चांगली माणसं भेटतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचं साडेसातीतही तारुण्य खुलेल. काहींना जीवनसहचरीचा लाभ. ता. ७ ची संकष्टी चंद्रोदयातून भाग्यसूचक. रेवती नक्षत्राने वागण्या-बोलण्यातून गैरसमज टाळावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com