साप्ताहिक राशिभविष्य : २३ ऑक्टोबर २०२२ ते २९ ऑक्टोबर २०२२ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope

साप्ताहिक राशिभविष्य : २३ ऑक्टोबर २०२२ ते २९ ऑक्टोबर २०२२

मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या

मेष : सप्ताहात खंडग्रास सूर्यग्रहणाच्या आचारसंहितेखाली राहावं लागेल. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी उपकरणं सांभाळावी. भाजणे, कापणे यापासून जपावं. बाकी दीपावलीचे दिवस शुक्रभ्रमणातून भावस्पंदनं जपणारे. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात या सप्ताहात तिन्हीसांजा वाद वाढवू शकतात. फक्त दीपाराधन करा, मौल्यवान वस्तू जपा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना संसर्गजन्य आजार होऊ शकतो.

वसुली होईल, मान-सन्मान मिळेल

वृषभ : सप्ताह गुरुभ्रमणातून संरक्षक राहील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ व्यावसायिक लाभ देईल. विशिष्ट वसुली होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी या सप्ताहात दुखापतीपासून जपावं. मात्र, सप्ताह मान-सन्मानातून धन्य करणारा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात प्रवासात अडथळे. स्त्रीचे रुसवे-फुगवे सांभाळा. शनिवारी खर्च होईल.

कलाकारांचा भाग्योदय

मिथुन : राशीचा मंगळ एक व्हायरस राहील. सप्ताहात चेष्टामस्करी नकोच. द्वाड मित्रसंगती टाळा. बाकी शुभग्रहांची मांदियाळी नोकरी- व्यावसायिक घटनांतून प्रसन्न ठेवणारी. मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ग्रहणाजवळ घबाडयोग. ता. २७ व २८ हे दिवस जल्लोषाचे. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीविरोध. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार गुप्तचिंतेचा. कलाकारांचा भाग्योदय.

नोकरीत लाभ, कौतुकाचा काळ

कर्क : राजकारणी व्यक्तींना सूर्यग्रहणाचा व्हायरस सतावू शकतो. बाकी शुभग्रहांच्या नेटवर्कचा पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती फायदा उठवू शकतील. दिवाळी पाडवा कौतुकाचा राहील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत लाभ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. २५ व २६ या दिवसांत मानसिक आणि शारीरिक संदर्भातून पथ्यं पाळावीत. वाहनं सांभाळा.

व्यावसायिकांना मोठे लाभ

सिंह : जनसंपर्कातून ता. २५ ऑक्‍टोबरच्या सूर्यग्रहणाचा व्हायरस राहील. शेजारीपाजारी जपावं. बाकी मघा नक्षत्राच्या व्यक्तींना दीपावलीत व्यावसायिक मोठे लाभ अपेक्षित आहेत. नोकरीत परिस्थितिजन्य लाभ होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींनी स्त्रीहृदय जपावं. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार वैयक्तिक सुवार्तांचा.

शुभग्रहांच्या फुलबाजा उडतील

कन्या : सप्ताहातील ग्रहमान आपणास सूर्यग्रहणाच्या पार्श्‍वभूमीवरही प्रदूषणमुक्त ठेवेल. मात्र, पंचमहाभूतांशी मस्ती नको. दीपावलीच्या प्रभावात सहवासातील मानवी बॉम्ब जपा. बाकी सप्ताहात शुभग्रहांच्या फुलबाजा उडतीलच. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचा भाग्योदय. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग आणि सुंदर रोषणाई. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार सन्मानाचा.

गुंतवणुकीतून लाभ

तूळ : राशीतील सूर्यग्रहणाचं प्रदूषण राहीलच. वृद्धांनी आरोग्यविषयक पथ्यं पाळावीच. व्यावसायिक मंडळींनी कायदेशीर घटक गोष्टी पाळाव्याच. बाकी तरुणांना बुध-शुक्राची खेळी विशिष्ट संधी निश्‍चितच देईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी मिळेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून लाभ. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सूर्यग्रहणाजवळ गुप्त शत्रुत्वाच्या झळा.

नोकरीत भाग्योदय व सन्मान

वृश्‍चिक : गुरुभ्रमण अतिशय संरक्षक राहील. ता. २५ व २६ हे दिवस आजूबाजूचं मानसिक पर्यावरण बिघडवू शकतात. नवपरिणीतांनी काळजी घ्यावी. बाकी ज्येष्ठा नक्षत्रास सप्ताहाची सुरुवात व्यावसायिक लाभ देणारीच. अनुराधा नक्षत्रास ता. २७ व ता. २८ ऑक्‍टोबर हे दिवस मोठेच शुभलक्षणी. नोकरीत भाग्योदय. मानसन्मान. शनिवारी प्रवासात जपा.

तरुणांना दीपावली छानच

धनू : दीपावली तरुणांना छानच. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सूर्यग्रहणाजवळ घबाडयोग. जुन्या गुंतवणुकीतून लाभ. ता. २३ व २४ हे दिवस वैयक्तिक लाभांचेच. मंगळवारच्या सूर्यग्रहणाजवळ स्त्रीशी भांडणं नकोत. बाकी पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट भागीदारीतून किंवा खरेदी-विक्रीतून फसण्याचे प्रसंग.

यंत्र व उपकरणांपासून सांभाळा

मकर : सप्ताह सूर्यग्रहणातून प्रदूषित होऊ शकतो. सर्व बाबतीत आचारसंहिता पाळाच. बाकी बुध-शुक्राचं फिल्ड तरुणांना संधी देणारं. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ नोकरी-व्यावसायिक पार्श्‍वभूमीवर सुसंगत राहील. मात्र सूर्यग्रहणाजवळ यंत्र, उपकरणांपासून सांभाळा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २३ व २४ हे दिवस वैयक्तिक सुवार्तांचे. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना वाहन भय.

खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार शक्य

कुंभ : सप्ताह बुध-शुक्राच्या खेळीतून मोठे चमत्कार घडवेल. ता. २७ ते २९ हे चढत्या क्रमाने शुभ. मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. सूर्यग्रहणाजवळ प्रवासात सांभाळा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार व्यावसायिक लाभाचा. शततारका नक्षत्रास ता. २७ चा गुरुवार गुप्तचिंता घालवेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार वाद वाढवणारा.

संसर्गजन्य आजारापासून जपा

मीन : सप्ताहाचा आरंभ वैयक्तिक शुभारंभातून प्रसन्न राहील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २३ ते २५ हे दिवस व्यावसायिक उठाठेवीतून लाभ देतील. नोकरीतील घडामोडी प्रसन्न ठेवतील. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सूर्यग्रहणाचं प्रदूषण राहील. संसर्गजन्य आजारापासून जपा. गर्भवतींना सांभाळावं. शनिवारी रस्त्यावर जपा.