खाकी वर्दीतील कलाकारांनी जिंकली रसिकांची मने.!

नाशिक - सण-उत्सवात बंदोबस्तामुळे तर कधी शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस सदैव कर्तव्यास तत्पर असतात. एकंदरीत कामाच्या व्यापामुळे निर्माण होणारा तणाव घालविण्यासाठी कला हे उत्तम माध्यम ठरू शकते. "सकाळ-कलांगण'च्या उपक्रमात सहभागी होतांना, पोलिस अधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांनी हे कृतीनीशी सिद्ध करून दाखविले. शरणपुर रोड परीसरातील जुने पोलिस आयुक्‍तालयात आयोजित या उपक्रमात कलांचे सादरीकरण करतांना खाकी वर्दीतील कलाकारांनी रसिकांची मने जिंकली.
मराठी कवी चंद्रशेखर सावरे यांनीही कवितेचे फलक लावले होते. ओझर येथील सोनवणे कुटुंबियांचाही सहभाग राहिला. कार्यक्रमास वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत, पोलिस उपनिरीक्षक संगीता निकम, बिनतारी विभागाचे पोलिस उपनिरीक्षक एस. एन. वराडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी. पी. जाधव, पोलिस हवालदार श्‍याम दुगजे, ज्येष्ठ समाजसेविका सुमन हिरे, चित्रकार अतुल भालेराव, प्रा. दीपक वर्मा, सतीश परदेशी यांच्यासह कालिका मंदिर ट्रस्टचे खजिनदार सुभाष तळाजिया, राजू रायमले, मुख्याध्यापक राजेंद्र निकम, पंकज गवळी, श्‍याम जाधव, दत्तात्रय कोठावदे, विनोद सोनवणे, अवी जाधव, संजय वाघ, सुरेश भोईर, रमाकांत तांबट, नारायण चुंभळे, श्‍याम दशपुत्रे, कवी राहुल कहांडळ, विजया येवलेकर, सायली मंडलीक आदी उपस्थित होते.

पोलिस बॅण्ड पथकाचे दमदार सादरीकरण
कार्यक्रमाची शोभा वाढविली ती पोलिस बॅण्ड पथकाच्या सादरीकरणाने. पोलिस आयुक्‍तांच्या आगमनापासून तर कार्यक्रमादरम्यान "जयोस्तुते' गीताचे तालबद्ध सादरीकरण यावेळी करण्यात आले. हवालदार संजय खराटे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहर पोलिस बॅण्ड पथकातील बॅण्ड मेजन एस. एन. खैराते, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ए. एन. सोनवणे, एम. बी. नंदाळे, हवालदार सी. एल. साळवे, डी. एन. गुरव, बी. ए. पवार, पोलिस नाईक व्ही. एस. देवरे, के. ए. सोनवणे, व्ही. ए. गायकवाड यांनी सहभाग नोंदविला.

स्वानंदीच्या रिदमिक योगाने उपस्थितांना केले थक्‍क
अतिशय कौशल्यपूर्ण अशा रिदमिक योगाचे सादरीकरण स्वानंदी वालझाडे हिने केले. शरीराच्या लवचिकतेची कसोटी पाहणाऱ्या या चित्त थरारक प्रात्येक्षिकांनी उपस्थित सर्वांना थक्‍क केले. तिच्या सादरीकरणाचे उपस्थितांपैकी प्रत्येकाने तोंड भरुन कौतुक केले. होरायझन ऍकॅडमी येथे इयत्ता सातवीत शिकत असलेल्या स्वानंदीने इयत्ता तिसरीला असतांना मलेशिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.

बाळकृष्ण वेताळ यांचे सुरेल बासरी वादन
हवालदार बी. एस. वेताळ यांनी सुरेल बासरी वादन केले. "दो रास्ते' या हिंदी चित्रपटातील "छुपगये सारे नजारे' या गीतावर त्यांनी सुंदर पद्धतीने वादन केले. पोलिस दलात समाविष्ट होण्यापूर्वी 1985 साली बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियानात सहभागी झालेल्या श्री.वेताळ यांनी कन्याकुमारी ते कश्‍मिर सायकल प्रवासात सहभाग नोंदविला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com