शेकडो हातांद्वारे कास रस्ता प्लॅस्टिकमुक्त

सोमवार, 14 मे 2018

सातारा - मनाला थंडावा देणारा हवेतील गारवा खात, उगवत्या सूर्याच्या साक्षीने रविवारी शेकडो हातांनी सातारा (बोगदा) ते कास या सुमारे २५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील प्लॅस्टिक कचरा वेचला. निसर्गप्रेमी सातारकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सुमारे ७५० पोती प्लॅस्टिक कचरा अवघ्या दोन तासांत गोळा झाला. या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सोबतीला प्रसिद्ध अभिनेते व सातारचे सुपुत्र सयाजी शिंदे होते. निमित्त होते ‘सकाळ’च्या पुढाकाराने आयोजिलेल्या महास्वच्छता अभियानाचे! (उल्हास भिडे - सकाळ छायाचित्रसेवा)