'त्यांच्या' स्वातंत्र्याचे हास्य नाउमेद नाही...

पुणे : आज आपण 71 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना यांच्या स्वातंत्र्याला सुरवातही झालेली नाही. जग कितीतरी पुढं गेलंय पण यांची पावलं समाजाने गावठाणच्या पुढे कधी पडूच दिली नाही. शिरुर तालुक्यातील पारधी समाजाचं हे वास्तव स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही आपल्या पुढे या छायाचित्रांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माणसाच्या प्राथमिक गरजा भागाव्यात एवढीही यांची ऐपत नाही...की ती आपणच हिरावून घेतली आहे त्यांच्यापासून...? 

फाटकं घोंगडं घेऊन अन्नाची भीक मागावी लागणाऱ्या या पारधींना आयुष्याचा प्रत्येक क्षण जरी संघर्ष असला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य नाउमेद झालेले नाही. त्यांच्या या उमेदीला आपल्या सोबतीची गरज आहे. या स्वातंत्र्यदिनी एकट्यापुरते नाही तर समाजातील अशा सगळ्या घटकांचे स्वातंत्र्य साजरे करुया!
(छायाचित्र : टीम ईसकाळ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com