अटलबिहारी वाजपेयींना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे काल (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर आज (शुक्रवार) दिल्लीतील राजघाटावरील राष्ट्रीय स्मृतीमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ''अटलबिहारी अमर रहे, वंदे मातरम्'', अशा घोषणांनी अत्यंत शोकाकुल वातावरणात अटलबिहारी वाजपेयी यांना अखेरचा निरोप देण्यात आला. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com