चार किलोमीटरसाठी तीस मिनिटे 

चिंचवड ते दापोडी या मार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. मोरवाडी चौक ते खराळवाडी या मार्गावर सर्व्हिस रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने हा मार्ग चिंचोळा झाला आहे. त्यातच रस्त्यांवर चारचाकी वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. नाशिक फाटा चौकात खासगी बसगाड्या भर रस्त्यातच उभ्या केल्या जातात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो. त्याची ही चित्रमय झलक टिपली आहे. सकाळचे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी.

चार किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल अर्धा तास वेळ लागतो. त्याचे कारण म्हणजे मेट्रोचे सुरू असलेले काम. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील सेवारस्त्याला गल्लीचे स्वरूप आले आहे. चिंचवडच्या महावीर चौक ते कासारवाडीपर्यंतच्या रस्त्यावर वाहनचालकांना दररोज कोंडीत अडकून पडावे लागत आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मेट्रो प्रशासन, वाहतूक पोलिस आणि महापालिका याकडे लक्ष देत नसल्याने वाहनचालक हैराण झालेत.

    पुणे-मुंबई महामार्गावर सकाळी-संध्याकाळी वाहनांच्या रांगा
    सेवारस्त्याला अक्षरश: गल्लीचे स्वरूप
    मेट्रो प्रशासन, वाहतूक पोलिस आणि महापालिकेचे दुर्लक्ष
    बीआरटी मार्गावरही गर्दी
    दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे दुहेरी पार्किंग, खासगी ट्रॅव्हल, थांबलेल्या बसेसमुळे कोंडीत भर
    शंकरवाडी चौकाकडे जाणारा रस्ता, फुगेवाडीतील सेवारस्त्यावर गंभीर स्थिती
    महामार्गावर काम करण्यासाठी मेट्रोकडून जादा जागेचा वापर

मेट्रोने जानेवारीअखेरपर्यंत काम पूर्ण होईल, असे आश्‍वासन महापालिकेला दिले आहे. त्यानंतर सेवारस्त्यावरील दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या होणार आहे. त्यानंतरच या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
- विजय भोजने, प्रवक्‍ता, बीआरटी

पिंपरी-चिंचवडमध्ये येण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई रस्त्याचा वापर करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. सेवा रस्त्यावर होणारे वाहनांचे पार्किंग आणि अतिक्रमण कोंडीसाठी कारणीभूत ठरत आहे. मेट्रो आणि वाहतूक पोलिसांनी याकडे दररोज लक्ष देणे आवश्‍यक आहे.
- राजेंद्र शिंदे, आकुर्डी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com