पोलिसांची ‘टार्गेट’ मोहीम

शहरातील प्रमुख रस्ते व चौकांमध्ये ठिकठिकाणी वाहतूक नियमन करण्याऐवजी वाहतूक पोलिस अक्षरशः कोंडाळे करून वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारत असल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या कोपऱ्यात दबा धरून बसणारे पोलिस हेल्मेट नसलेले दुचाकीचालक किंवा मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना ‘टार्गेट’ करून त्यांच्याकडून दंड वसूल करीत आहेत. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडून वाहनांची एकमेकांना धडक बसण्याचे प्रकारही घडत आहेत. सिग्नल सुटल्यानंतर भरधाव वाहनांच्या गर्दीत हेल्मेट नसलेल्यांच्या मागे धावण्याच्या प्रकारामुळे वाहनचालकांसह पोलिसांचाही जीव धोक्‍यात आला आहे. (गजेंद्र कळसकर - सकाळ छायाचित्रसेवा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com