अतिक्रमणांनी गिळले पदपथ

शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पौड रस्ता - नागरिकांना चालण्यासाठी पुरेशी जागा मिळाली पाहिजे या भावनेतून पदपथ तयार करण्यात आले. परंतु पदपथांचा ताबा विविध अतिक्रमणांनी घेतला.  व्यावसायिक इमारतीला पार्किंग नसते. असलेले पार्किंग व्यवसायासाठी वापरले जाते. त्यामुळे वाहने रस्त्यावर लावली जातात. परिणामी, रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडीचे प्रकार कोथरूडमध्ये वाढले आहेत. सध्या सगळीकडे रुंद पदपथ तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यावर अतिक्रमणे झाल्यास हे पदपथ रुंद करून काय उपयोग, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहेत. कोथरूड परिसरातील चित्र. (छायाचित्र - जितेंद्र मैड)