सलाम ‘ती’च्या सामर्थ्याला

शुक्रवार, 8 मार्च 2019

‘बॅलन्स फॉर बेटर’ ही यंदाच्या महिला दिनाची ‘थीम.’ लिंगसमानतेबरोबरच उत्तम जीवनासाठी करिअर आणि घर यांतील संतुलनाचा विचार त्यामागे आहे; पण यात जी स्त्री आपले सर्व स्वत्व विसरून आपल्या घरासाठी राबते, कष्टते तिचा काही विचार आहे की नाही? तिच्या कामाला, तिला काही किंमत आहे की नाही? या प्रश्‍नाचे उत्तर अर्थातच ‘आहे’ असे आहे. गृहिणीपद भूषविणाऱ्या या महिला कुटुंबाचेच नव्हे, तर समाजाचे आभाळ तोलून धरत असतात. किती तरी प्रकारची कामे करीत असतात त्या. त्यांची आठवण सर्वांनाच करून देण्यासाठी ही खास चित्रमालिका...  (छायाचित्रे - प्रशांत चव्हाण, सत्यवान वास्कर, अनिकेत गावडे)

तू गृहिणी...
गृहस्वामिनी...
तू माता, तू पत्नी
तू भक्ती, तू शक्ती
तू एक स्वतंत्र व्यक्ती

तू पेलतेस आभाळ
तू तोलतेस घर
तुझ्या शंभर हातांवर

सांभाळणं, जोडणं, वाढवणं,
शिकणं, शिकवणं, पाळणं आणि पोसणं
अवघं जगणं... हेच तुझं करिअर

कोणी मानो न मानो, पण
तुझ्या जगाची तूच असतेस बॉस
हे गृहस्वामिनी, तू असतेस खास!