उत्तर महाराष्ट्रात मतदारांचा दांडगा उत्साह

सोमवार, 29 एप्रिल 2019

उत्तर महाराष्ट्रात मतदारांचा दांडगा उत्साह

उत्तर महाराष्ट्रात मतदारांचा दांडगा उत्साह
नाशिकः नाशिक,दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदार संघात सकाळपासूनच मतदारांचा चांगला उत्साह पहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रातील  शहरी भागासह ग्रामीण भागातही मतदारकेंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा आहेत, दुपारी एक पर्यत नाशिक केंद्रात 26.61 तर दिंडोरीला 33.65 टक्के मतदान झाले होते. मतदान करण्यास नवमतदारांसह साऱ्याचाच उत्साह दिसून आली.. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ,उमेदवार समीर भुजबळ,आ.पंकज भुजबळ,मीनाताई भुजबळ,डॉ.शेफाली भुजबळ,महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे,याच्यासह अभिनेत्री मृणाल दुसानीस,विद्या करंजीकर,जिल्हाधिकारी सुरज मांढरे,निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर,पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आदींनी सक्रीय सहभाग नोंदवत मतदान केले. (:छायाचित्रे- सोमनाथ कोकरे, केशव मते)