उन्हाच्या तडाख्यात फुलांचा रंगोत्सव

बुधवार, 15 मे 2019

राजापूर - कडाक्याच्या उन्हाचा रखरखाट, त्यातून अंगाची होत असलेली लाहीलाही अशा स्थितीमध्ये निसर्गामध्ये फुललेली विविधांगी फुले मनाला उल्हासित करतात. भर उन्हाळ्यामध्ये बहरलेला निसर्गाचा रंगोत्सव सार्‍यांचे लक्ष वेधून घेत आहे. वाढत्या उष्प्म्यामध्ये फेरफटका मारताना जीव नकोसा होतो. आकर्षक रंगछटा असलेली ही फुले मनाला वेगळा आनंद मिळवून देताना मनासह शरीरामध्ये आलेला क्षीण क्षणार्धात नाहीसा करतात. दिवसागणिक वाढत्या उष्म्यामध्ये उन्हाचा तडाखा सार्‍यांना नकोसा झाला आहे. उन्हाच्या रखरखाटामध्ये बाहेर फिरणे मुश्किल झाले आहे.

राजापूर - कडाक्याच्या उन्हाचा रखरखाट, त्यातून अंगाची होत असलेली लाहीलाही अशा स्थितीमध्ये निसर्गामध्ये फुललेली विविधांगी फुले मनाला उल्हासित करतात. भर उन्हाळ्यामध्ये बहरलेला निसर्गाचा रंगोत्सव सार्‍यांचे लक्ष वेधून घेत आहे. वाढत्या उष्प्म्यामध्ये फेरफटका मारताना जीव नकोसा होतो. आकर्षक रंगछटा असलेली ही फुले मनाला वेगळा आनंद मिळवून देताना मनासह शरीरामध्ये आलेला क्षीण क्षणार्धात नाहीसा करतात. दिवसागणिक वाढत्या उष्म्यामध्ये उन्हाचा तडाखा सार्‍यांना नकोसा झाला आहे. उन्हाच्या रखरखाटामध्ये बाहेर फिरणे मुश्किल झाले आहे. उन्हाच्या तडाखा आणि त्यामध्ये तीव्र पाणीटंचाई अशा स्थितीमध्ये निसर्गात फुललेला रंगोत्सव सार्‍यांचे लक्ष वेधून घेत आहे. गुलमोहोराखाली फुलांचा गालिचा बघायला मिळत आहे. (छायाचित्र ः प्रसाद सिनकर, राजापूर)