पाऊस आला, आनंद झाला!

शनिवार, 20 जुलै 2019

औरंगाबाद - दीर्घ प्रतीक्षेनंतर शहरात आणि जिल्ह्यात आज दुपारी पाऊस झाला. सकाळपासूनच ढगांनी दाटी केली होती. अधून-मधून उन्हही पडत होते. त्यामुळे नेहमीप्रमाणे आजही पाऊस हुलकावणी देईल, असेच वाटल्याने विना छत्री आणि रेडकोटचे अनेक जण बाहेर पडले. दुपारी झालेल्या पावसाशी त्यांची गाठ पडली. आजचा पाऊस दमदार नसला तरी बऱयापैकी पडला. औरंगाबाद तालुक्यात 8.80 (153.10), फुलंब्री 32.50 (238.25), पैठण 14.9 (82.46), सिल्लोड 0.88 (214.44), सोयगाव 1.33 (186.67), वैजापूर 7.80 (149.80), गंगापूर 6.56 (127.11), कन्नड 6.13 (137.50) आणि खुलताबाद तालुक्यात 18.00 (120.00) तर जिल्ह्यात एकूण 156.59 मि.मी.

औरंगाबाद - दीर्घ प्रतीक्षेनंतर शहरात आणि जिल्ह्यात आज दुपारी पाऊस झाला. सकाळपासूनच ढगांनी दाटी केली होती. अधून-मधून उन्हही पडत होते. त्यामुळे नेहमीप्रमाणे आजही पाऊस हुलकावणी देईल, असेच वाटल्याने विना छत्री आणि रेडकोटचे अनेक जण बाहेर पडले. दुपारी झालेल्या पावसाशी त्यांची गाठ पडली. आजचा पाऊस दमदार नसला तरी बऱयापैकी पडला. औरंगाबाद तालुक्यात 8.80 (153.10), फुलंब्री 32.50 (238.25), पैठण 14.9 (82.46), सिल्लोड 0.88 (214.44), सोयगाव 1.33 (186.67), वैजापूर 7.80 (149.80), गंगापूर 6.56 (127.11), कन्नड 6.13 (137.50) आणि खुलताबाद तालुक्यात 18.00 (120.00) तर जिल्ह्यात एकूण 156.59 मि.मी. पावसाची नोंद झाली.                                                                                                                             (छायाचित्रे : सचिन माने)