पावसाचा जोर कायम; नद्या फुल्ल; धरणे ओसंडून वाहिली

सोमवार, 5 ऑगस्ट 2019

पुणे - कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर शनिवारीही (ता.४) पावसाचा जोर सुरूच आहे. नद्यांना पूर येऊन  शहरे, गावे आणि शेतीमध्ये पाणी शिरले. पुणे, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. गोदावरी नदीला पूर आल्याने नाशिकमध्ये अनेक गावांमध्ये पाणी शिरले आणि शेती पाण्याखाली गेली. राज्यात इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.