जागर आदिशक्तीचा, उत्सव नवरंगांचा (पांढरा रंग) 

पिंपरी - पारंपरिक पद्धतीने शहरात शारदीय नवरात्रीला सुरूवात झाली. हे नऊ दिवस मांगल्याचे एकतेचे प्रतिक म्हणून भक्तीभावाने साजरे केले जातात. नवरात्रामध्ये घातल्या जाणाऱ्या कपड्यांच्या रंगांमध्ये कोणतीही धार्मिक आधार नसला तरी तो नवरंगांचा उत्सव आहे. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे परिधान केल्यामुळे नवरात्र खुलते. महिलांमध्ये एकजुटीची भावना जोपासली जाते. मनात उत्साह, आनंद व सुरक्षिततेची भावना निर्माण होते. स्वाभिमान व आत्मविश्वास जागृत होतो. स्त्री शक्तीचे दर्शन घडते व सर्व जण एकत्रितरीत्या हा नवरात्रोत्सव खऱ्या अर्थाने साजरा करतात. हाच उद्देश प्राधान्याने नवरात्रातील नवरंगांमध्ये आहे. "सकाळ नवरंग'च्या निमित्ताने सोमवारी (ता.30) ला पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान केलेल्या छायाचित्रांसह महिला व तरूणींनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com