तुळजाभवानी मातेची रथअलंकार महापूजा

बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानी मातेच्या वेगवेगळ्या अवतार पूजा बांधल्या जातात. त्यानुसार बुधवारी (ता. दोन) रथअलंकार महापूजा बांधण्यात आली. तुळजाभवानी मातेस सोने, माणिक, मोती अशा अनेक दागदागिन्यांचा पेहराव करण्यात आला होता. त्यात चढावी मुकुट, छत्र, सोन्याचे दोन हात, सोन्याचे पाय, नेत्रजोड, मोत्यांचा कंठा, नथ, मणी-मंगळसूत्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली पुतळ्याची माळ, हिरकण्यांचे पदक, सातपदरी पुतळ्याची माळ, माणिकाचे पदक, खडावजोड आदींसह अनेक प्राचीन दागिन्यांचा समावेश होता. 