VidhanSabha 2019 : नाशिकमध्ये 'या' उमेदवारांनी भरले अर्ज

गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

#Vidhansabha2019 नाशिक : नाशिक पश्चिम मधून अपूर्व हिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने पश्चिम मतदार संघातून उमेदवारी अपक्ष अर्ज भरला असल्याचे हिरे म्हणाले.

-नाशिक : येवल्यातील अखिल भारतीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे पाटील यांनी आज (ता.३) राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

#Vidhansabha2019 नाशिक : नाशिक पश्चिम मधून अपूर्व हिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने पश्चिम मतदार संघातून उमेदवारी अपक्ष अर्ज भरला असल्याचे हिरे म्हणाले.

-नाशिक : येवल्यातील अखिल भारतीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे पाटील यांनी आज (ता.३) राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

-नाशिक मध्य मधून भाजप उमेदवार देवयानी फरांदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी खासदार हेमंत गोडसे, महापौर रंजना भानसी, सुनील बागुल, उद्धव निमसे यांच्यासह कार्यकर्ते

-नाशिक : विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीच्या वतीने इगतपुरी त्र्यंबकेश्वर निवडणूक अधिकारी तेजस चव्हाण यांच्याकडे नामनिर्देशन अर्ज दाखल करतांना निर्मला गावित, खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार शिवराम झोले, उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव आदी

-नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज (ता.३) येथे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षांच्या महाआघाडीचे निफाड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार दिलीप बनकर यांना एबी फॉर्म देण्यात आला.

-नाशिक : पश्चिम मतदारसंघासाठी सीमा हिरे उमेदवारी अर्ज भरण्यास कार्यकर्त्यांसह दाखल

-नांदगाव : भाजपाचे माजी आमदार संजय पवार यांनी नांदगाव विधानसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अपक्ष अर्ज दाखल.

-नांदगाव : भाजपाचे रत्नाकर पवार यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. तर आमदार पंकज भुजबळ यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. पण एबी फाँर्म नाही. अर्ज दाखल पण शक्ती प्रर्दशन टाळले

येवला : शिवसेना-भाजपा मित्रपक्षाचे उमेदवार संभाजी पवार यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी माजी आमदार मारोतराव पवार,आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, माजी आमदार कल्याणराव पाटील,रुपचंद भागवत आदी उपस्थित होते

-गणुर : चांदवड-देवळा मतदार संघाचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी आज (ता. ३) रोजी मोठे शक्तिप्रदर्शन करीत काँग्रेस पक्षाकडून आपला विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार उत्तमबाबा भालेराव देखील उपस्थित होते.

-मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण चार उमेदवारांनी 5 उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) दाखल केले. आमदार शेख असिफ शेख रशीद- काँग्रेस (2 अर्ज), मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल- (एमआयएम), शेख इब्राहिम शेख असलम (भाजप), बहबुद अब्दुल खालिक (अपक्ष

-सिडको : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासोबत ओबीसीच्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश घेतला.