जॅग्वार वर कार

शुक्रवार, 21 एप्रिल 2017

क्वालालंपूर - येथे एका मलेशियन उद्योगपतीने आपली 'जॅग्वार एस टाईप' ही गाडी जवळपास 4,600 छोट्या कारचा वापरुन सुशोभित केली आहे. मलेशियातील रसत्यांवर ही कार सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेच, त्याचबरोबर सोशल मिडियावर देखील या कारचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

ही कार लक्षवेधी ठरत असली तरी, सुरुवातीला या कारचा नेमका मालक कोण आहे याबबत कोणालाच काही माहिती नव्हती. हा एकादा मार्केटिंग साठी केलेला स्टंट देखील असू शकतो अशी चर्चा सोशल मिडियावर रंगली होती.

परंतु, एका मलेशिअन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षाचा दातूक सेरी माहादी बादरुल झमान असे या कारच्या मालकाचे नाव आहे. वयाच्या 13 वर्षापासून छोट्या कार जमविण्याचा छंद झमानला होता. आत्तापर्यंत झमान यांनी जवळपास 5000 कारचे कलेक्शन केले आहे. त्यातल्याच 4,600 कारचा वापर करुन त्यांनी आपली ही मोठी कार सुशोभित केली आहे. 

''जॅग्वार एस टाईप ही गाडी घेतल्यापासून माझ्या डोक्यात ती काहितरी वेगळी दिसावी अशी कल्पना आली होती. त्यासाठी मी विचार करत होतोच. मला कारच्या कलेश्नचा छंद लहानपणापासून होताच. त्याचाच वापर करुन मी माझी कार अशी हटके बनविली आहे''.