मुंबई इंडियन्सचा विजयी रथ रोखला

मुंबई : एरवी सफाईदारपणे धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सची गाडी आज मात्र घसरली आणि आयपीलच्या दहाव्या मोसमात महाराष्ट्र डर्बित पुन्हा एकदा पुण्याने बाजी मारली. वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना पुणेकरांनी तीन धावांनी जिंकला. 

मुंबई संघाने पुण्याला प्रथम फलंदाजी देऊन 160 धावांत रोखले खरे; परंतु आज टॉप गिअर टाकताच आला नाही. रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करून अखेरपर्यंत प्रयत्न केले. बेन स्टोक्‍सची प्रभावी आणि अचूक गोलंदाजी पुण्याचा या विजयात मोल्यवान ठरली. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही त्याने दिमाखदार कामगिरी केली. 

तत्पूर्वी अजिंक्‍य रहाणे आणि राहुल त्रिपाठी यांनी पुण्याला 76 धावांची दमदार सलामी दिली होती; परंतु कर्णधार स्टीव स्मिथ आणि धोनी अपयशी ठरल्यामुळे पुण्याच्या वाटचालीला ब्रेक लागला. त्यानंतर स्टोक्‍स आणि मनोज तिवारी यांनी दिलेल्या योगदानामुळे पुणे संघाला 160 धावा करता आल्या. 

संक्षिप्त धावफलक 
रायझिंग पुणे सुपरजायंटस्‌ : 20 षटकांत 6 बाद 160 (अजिंक्‍य रहाणे 38-32 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, राहुल त्रिपाठी 45-31 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार, स्टीव स्मिथ 17-12 चेंडू, 2 चौकार, मनोज तिवारी 22-13 चेंडू, 4 चौकार, कर्ण शर्मा 4-0-39-2, बुमराह 4-0-29-2, हरभजन सिंग 4-0-20-1)

वि. वि. मुंबई इंडियन्स 20 षटकांत 8 बाद 157 (पार्थिव पटेल 33-27 चेंडू, 4 चौकार, रोहित शर्मा 58-39 चेंडू, 6 चौकार, 3 षटकार, उनडकट 4-0-40-2, स्टोक्‍स 4-1-21-2, ताहिर 4-0-32-1)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com