तळवडे परिसरात जिवंत देखाव्यांवर भर

रावेत - तळवडे, रुपीनगर, पुनावळे भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परंपरेप्रमाणे जिवंत देखावे सादर करीत पर्यावरणासह सामाजिक बांधिलकीचा विचार देण्याचा प्रयत्न केला आहे.

तळवडे गावठाणातील परिसरातील गणेश मंडळांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करीत आहेत. छत्रपती शिवाजी मित्र मंडळाचे यंदाचे ४३ वे वर्ष आहे. मंडळाने या वर्षी आकर्षक विद्युत रोषणाईची परंपरा कायम ठेवली आहे. मंडळाची गणेशमूर्ती ही जवळपास ४० वर्षांपूर्वीची शाडू मातीपासून बनवलेली असल्याने पर्यावरण पूरक उत्सवाला मंडळ महत्त्व देत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष, नगरसेवक पंकज भालेकर यांनी दिली. 

जोतिबानगर येथील शिवतेज मित्र मंडळाने सजावटीचा खर्च टाळून अनाथाश्रमातील मुलांना मदत केली आहे. अनिल भालेकर मंडळाचे अध्यक्ष आहेत. रुपीनगर येथील एकता मित्र मंडळ ३५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. मंडळाने याही वर्षी जिवंत देखावा सादर केला आहे. आई वडिलांना विसरू नका.! हा देखावा सादर करून समाजप्रबोधन केले आहे. या देखाव्यांमध्ये काम करणारे सर्व सदस्य हे मंडळाचे बालकलाकार आहेत. त्यातून स्थानिक कलाकारांना संधी मिळाली आहे. त्यांच्या कलागुणांना वाव दिला जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सचिन ढवळे यांनी सांगितले.  दक्षता मित्र मंडळ नेहमीच नवनवीन संकल्पना राबवीत असते. येथील भव्य मंदिरात गणेशाची प्रतिष्ठापना केली असून, मंडळाने या वर्षी ‘हेची दान देगा मानवा’ हा देखावा सादर करून, अवयव दान करा हा सामाजिक संदेश दिला आहे. तसेच मंडळाच्या ३० सदस्यांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेत पहिले पाऊल टाकले आहे. मंडळाच्या वतीने चिनी मालावर बहिष्कार टाकून स्वदेशीचा वापर करा, असे फलक लावले आहेत. गणेशोत्सवात चिनी मालाची होळी करणार असल्याचे अध्यक्ष कुणाल पाटील यांनी सांगितले.

नवयुग मित्र मंडळाने ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हा पर्यावरणावरील देखावा सादर करून पर्यावरण संवर्धनाचा मंत्र दिला आहे. क्रांतिज्योत मित्र मंडळाने ‘मल्लीमल्लाचा वध हा एक चमत्कारी प्रयोग’ हा देखावा सादर केला आहे. तुकाराम भालेकर मंडळाचे अध्यक्ष आहेत. सुदर्शन मित्र मंडळाने वृक्षराजाच्या छायेत गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. संतोष भालेकर मंडळाचे अध्यक्ष आहे. तर ईगल मित्र मंडळाने विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. महेश जवळगी मंडळाचे अध्यक्ष आहेत. गणेशनगर गणेश मित्र मंडळाने विद्युत रोषणाई केली आहे. पालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ विविध कार्यक्रम राबवीत आहे. संतकृपा मित्र मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. इंद्रायणी नमामी हा उपक्रम राबविण्यासाठी इतर मंडळे आणि घरगुती गणेशोत्सव साजरा करताना शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी तसेच विसर्जन करताना विसर्जन कुंडात करावे, असे आवाहन करण्यात येत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड तसेच सुहास ताम्हाणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com