सोशल मीडियाच्या दुष्परिणामावर देखावा

Thursday, 31 August 2017

हडपसर - नवरंग मित्र मंडळाने सामाजिक प्रबोधन करणारा देखावा सादर केला आहे. मोबाईलचे व्यसन, युवकांचे सेल्फीमुळे झालेले मृत्यू, मोबाईल गेमद्वारे होणारे होणारे दुष्परिणाम, फेसबुक, व्हॉट्‌सअपच्या अति वापरामुळे निर्माण झालेले प्रश्‍न आदी विषय हाताळले आहेत, अशी माहिती विजय बणपट्टी यांनी दिली.     

हडपसर - नवरंग मित्र मंडळाने सामाजिक प्रबोधन करणारा देखावा सादर केला आहे. मोबाईलचे व्यसन, युवकांचे सेल्फीमुळे झालेले मृत्यू, मोबाईल गेमद्वारे होणारे होणारे दुष्परिणाम, फेसबुक, व्हॉट्‌सअपच्या अति वापरामुळे निर्माण झालेले प्रश्‍न आदी विषय हाताळले आहेत, अशी माहिती विजय बणपट्टी यांनी दिली.     

मांजरी फाटा येथील श्री गणेश मित्र मंडळाचे यंदा ३६ वे वर्ष असून, याही वर्षी हलत्या देखाव्याची संकल्पना कायम राखली आहे. तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित ‘गड आला पण सिंह गेला’, हा हलता देखावा सादर केला आहे. देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष सचिन मोरे, हितेश घाडगे असून, अध्यक्ष आकाश भोजने आहेत. देखावा साकारण्यासाठी अमोल मारणे, अमोल पवार यांनी परिश्रम घेतले आहेत. वर्षभर मंडळ सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे.

निर्माल्य वाहन, आपल्या दारी...
मुंढवा - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत कोरेगाव पार्क-घोरपडी प्रभागात गणेशोत्सवात निर्माल्य संकलनासाठी ‘निर्माल्य वाहन, आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. नगरसेविका लता धायरकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. घोरपडी, कोरेगाव पार्क, मुंढवा, केशवनगर परिसरातील गणेश मंडळांकडून निर्माल्य जमा करण्यासाठी निर्माल्य वाहन तयार केले आहे. ते दिवसभर या भागांतील गणेश मंडळे व वसाहतीमध्ये जाऊन दैनंदिन निर्माल्याचे संकलन करते; तसेच घरगुती निर्माल्यसुद्धा जमा केले जाते. या उपक्रमासाठी गणेशोत्सव मंडळे व सोसायट्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी दोन वाहनांची व्यवस्था करण्यात अली आहे. जमा झालेले निर्माल्य मांजरी रस्त्यावरील मोकळ्या प्लॉटमध्ये मोठा खड्डा घेऊन त्यात टाकले जात आहे. दहा दिवसांनंतर त्यावर प्रकिया करून खतनिर्मिती केली जाईल, असे धायरकर यांनी सांगितले.