उदे ग अंबे उदे...! 

शनिवार, 23 सप्टेंबर 2017

नांदेड जिल्ह्यातील माहुर येथील माहुर गडावर नवरात्र उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरा होत आहे. राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या माहुर गडावरील रेणुका मातेच्या दर्शनास विदर्भ व मराठवाड्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील भक्तांची मांदियाळी लागत आहे. रेणुका मातेच्या दर्शनानंतर भाविक दत्तशिखरावर जावुन दत्तात्रयाचे व नंतर शेकडो पायऱ्या असलेल्या अनुसया मातेचा पर्वत चढुन अनुसया मातेचे दर्शन करून परतीच्या प्रवासाला निघतात.

नांदेड जिल्ह्यातील माहुर येथील माहुर गडावर नवरात्र उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरा होत आहे. राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या माहुर गडावरील रेणुका मातेच्या दर्शनास विदर्भ व मराठवाड्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील भक्तांची मांदियाळी लागत आहे. रेणुका मातेच्या दर्शनानंतर भाविक दत्तशिखरावर जावुन दत्तात्रयाचे व नंतर शेकडो पायऱ्या असलेल्या अनुसया मातेचा पर्वत चढुन अनुसया मातेचे दर्शन करून परतीच्या प्रवासाला निघतात. निर्सर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या माहुर गडावरील रेणुकामाता व दत्तशिखरावरून रेणुका मातेसह रेणुकामाता टेकडी, गोंड कीला, मातृतीर्थ, दत्त शिखर, अनुसया माता पर्वत माहुर गडावरील हे अलौकीक सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे आमचे दिग्रस (जि. यवतमाळ) छायाचित्रकार रामदास पद्मावार यांनी.