परिसर झाला लख्ख 

सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

"सकाळ'च्यावतीने गांधी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत राजकारणीपासून सामान्य नागरिकांपर्यंत, महापालिका आयुक्तांपासून स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. चिंचवडमधील पवना नदीच्या गणपती विसर्जन घाटावरील अस्वच्छतेचे साम्राज्य अवघ्या अर्ध्या तासात स्वच्छ केले. नदीपात्रात टाकलेले निर्माल्य, कुजलेल्या फुलांचे ढीग, प्लॅस्टिकच्या पिशव्या असा सुमारे साडेतीन टनाचा कचरा उचलून घाटाचा परिसर लखलखीत केला. जवळच असलेला जिजाऊ उद्यानाकडे जाणारा मार्ग देखील झाडून लख्ख केला. या कार्यक्रमाची सचित्र झलक...

"सकाळ'च्यावतीने गांधी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत राजकारणीपासून सामान्य नागरिकांपर्यंत, महापालिका आयुक्तांपासून स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. चिंचवडमधील पवना नदीच्या गणपती विसर्जन घाटावरील अस्वच्छतेचे साम्राज्य अवघ्या अर्ध्या तासात स्वच्छ केले. नदीपात्रात टाकलेले निर्माल्य, कुजलेल्या फुलांचे ढीग, प्लॅस्टिकच्या पिशव्या असा सुमारे साडेतीन टनाचा कचरा उचलून घाटाचा परिसर लखलखीत केला. जवळच असलेला जिजाऊ उद्यानाकडे जाणारा मार्ग देखील झाडून लख्ख केला. या कार्यक्रमाची सचित्र झलक... (संतोष हांडे - सकाळ छायाचित्रसेवा)