'बली'प्रतिपदेस निघाली रेड्यांची मिरवणूक

रविवार, 22 ऑक्टोबर 2017

नाशिक : दिवाळीतील पाडवा म्हणजे आपल्या औजारांची, वाहनांची, चरितार्थ चालवणाऱ्या साधनांची पुजा करण्याचा दिवस. या दिवशी हमाल मंडळी आपल्या हातगाड्यांची पूजा करतात. व्यापारी आपल्या वह्यांची पूजा करुन नववर्षाची सुरुवात करतात. काही ठिकाणी तर या दिवशी गाढवांना आंघोळ घालून त्यांना रंगविले जाते. बहुतेक ठिकाणी पतीराजांचे औक्षण करून पुजले जाते. नवविवाहित जावयाला या दिवशी सुवर्ण आहेरही दिला जातो. विविध भागात विविध परंपरा असतात. (छायाचित्रे- सोमनाथ कोकरे)