पुण्यात फुटपाथ नक्की कुणासाठी?

बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहने उभी करण्याच्या जागेत अनधिकृत पथाऱ्या थाटल्या जात आहेत. खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांचाही यात समावेश आहे. केवळ रस्ताच नव्हे, तर पदपथही अडवून त्यावर अनधिकृत पथारी व्यावसायिकांनी बस्तान मांडले आहे. महापालिका प्रशासन अधिकृत पथारीवाल्यांचे पुनर्वसन करीत नाही अन्‌ अनधिकृत पथारी व्यावसायिकांना अभय देत आहे. असे का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. भाजपचे सत्ताधारीही याबाबत मूग गिळून गप्प आहेत.

शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहने उभी करण्याच्या जागेत अनधिकृत पथाऱ्या थाटल्या जात आहेत. खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांचाही यात समावेश आहे. केवळ रस्ताच नव्हे, तर पदपथही अडवून त्यावर अनधिकृत पथारी व्यावसायिकांनी बस्तान मांडले आहे. महापालिका प्रशासन अधिकृत पथारीवाल्यांचे पुनर्वसन करीत नाही अन्‌ अनधिकृत पथारी व्यावसायिकांना अभय देत आहे. असे का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. भाजपचे सत्ताधारीही याबाबत मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे पदपथावरून चालण्यासाठी आणि वेळप्रसंगी रस्त्यावर दुचाकी उभी करण्यासाठी जागा शोधणाऱ्या सामान्य माणसाला त्रास होत आहे. मध्य भागातील काही प्रातिनिधिक उदाहरणे.