धावपळीच्या जीवनात सगळे कामात व्यस्त असताना तुमच्या शहरात काय चाललंय याची कल्पना फार कमी लोकांना असते. अशा वेळी मात्र सीआयडी हा शो प्रेक्षकांना तासाभरात सतर्क करण्यात गेल्या अनेक वर्षांपासून महत्वाची भूमिका बजावतोय. सीआयडीमधील एक महत्वाचं पात्र म्हणजे आदित्य श्रीवास्तव. कदाचित आदित्य श्रीवास्तव हे नाव तुमच्यासाठी अनोळखी असेल.मात्र 'सीआयडी इनस्पेक्टर अभिजीत' म्हटलं की प्रेक्षकांना गेल्या अनेक वर्षात या नावाचा विसर पडलेला नाही. आज अभिजीत म्हणजेच ऑफस्क्रिन आदित्यचा वाढदिवस. त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊया मुंबई शहरात येणाऱ्या आदित्य ते सीआयडी इनस्पेक्टर अभिजीतचा जीवनप्रवास.
सीआयडी इनस्पेक्टरच्या भूमिकेत दिसणारा आदित्य आज वयाच्या ५९ व्या वर्षात पदार्पण करतोय. सुल्तानपुर आणि अलाहाबाद शहरातून या अभिनेत्याचं शिक्षण झालंय.शिकताना अभिनेत्याने नाटकात भाग घेतला होता. तेव्हापासून अॅक्टिंगमध्येच करियर करण्याचं त्याने ठरवलं. त्यासाठी अभिनेता मुंबईत पोहोचला.
एके काळी वीओ आर्टिस्ट होता होता आदित्य. अॅक्टिंगव्यतिरिक्तही आदित्यने बरेच काम केले आहेत. अनेक जाहिरांतीमध्ये त्याने व्हॉईस ओवरचेही काम केले आहे. आदित्यने शेखर कपूरच्या 'बॅटिंग क्वीन' या चित्रपटात पुट्टीलालची भूमिका साकारली होती.
मात्र 'सीआयडी' या टीव्ही शोमुळे आदित्यला त्याची ओळख मिळाली. यातील भूमिकेनंतर आदित्य घराघरात पोहोचला. चाहता वर्ग आदित्यला आजही सीआयडी इन्स्पेक्टर अभिजीतच्या नावाने ओळखतात. याशिवाय आदित्यने व्योमकेश बक्शी, नया दौर, ये शादी नही हो सकती, आहट यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
आदित्यने अनेक चित्रपटांतही काम केले आहे. सत्या, गुलाल, पाँच, ब्लॅक, कालू आणि 'दिल से पूछ किधर जाना है' यांसारख्या चित्रपटांतून आदित्यने त्याच्या कमलीच्या अभिनयाची ओळख प्रेक्षकांना करून दिली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.