Tue, May 30, 2023
PHOTO : साताऱ्यात आदमापूरच्या बाळूमामांचा जयघोष; भंडाऱ्यानं माखलं उदयनराजेंचं 'जलमंदिर'
Published on : 5 March 2023, 11:46 am
भाविकांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामाच्या नावानं चांगभलंचा जयघोष केला.
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या 'जलमंदिर पॅलेस' या निवासस्थानी बाळूमामाच्या पालखीचं आज आगमन झालं.
यावेळी खासदार उदयनराजेंनी पालखीचं स्वागत करून बाळूमामांचं दर्शन घेतलं.
बाळूमामाची पालखी आज खासदार उदयनराजेंच्या 'जलमंदिर' या निवासस्थानी दाखल झाली आहे.
दरम्यान, भाविकांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामाच्या नावानं चांगभलंचा जयघोष केला.
या पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते.
सोहळ्यात महिलाही अंबील घागरी डोक्यावर घेऊन उपस्थित होत्या.
भंडाऱ्याच्या उधळणीत आख्खा परिसर पिवळा धमक झाला होता. (फोटो : प्रमोद इंगळे)