उर्जा मंत्री नितीन राऊत आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात निधी वाटपासून अनेक मुद्यावर कॅबीनेट बैठकीत उडालेले खटके, शाब्दिक चकमकी सर्वांना ठाऊक आहे. मात्र बुधवारी या दोन्ही नेत्यामधील वेगळाच जिव्हाळा अनुभवायला मिळाला. एरवी आपल्या कॅबीनेट सहकाऱ्यांच्या भेटायला त्यांच्या बंगल्यामध्ये अभावाने जाणारे अजित पवार थेट नितिन राऊत यांच्या मलबार हिलमधील पर्णकुटी या बंगल्यावर पोहोचले आणि काही शासकीय विषय वगळता दोन्ही नेत्यामध्ये जवळपास ३० मिनीटे गप्पा रंगल्या.
एका बैठकीनिमित्ताने दोघांची भेट व्हायची होती. दरम्यान नितीन राऊत यांचा पाय मुरगळ्याचे वृत्त दादांना कळले आणि त्यांनी थेट नितीन राऊत यांच्या घरी जाण्याचा बेत आखला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उर्जामंत्री नितीन राऊत या दोघांमध्ये काही विषयावर मतभेद जरुर आहे. मात्र आम्ही वैयक्तिक संबध कायम जपले आहेत. असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सकाळशी बोलताना सांगीतलं.
अजित दादा बंगल्यावर आले असताना पाय दूखावला असतानाही नितीन राऊत कार्यालयाबाहेर त्यांना घेण्यासाठी आले. दोन्ही नेत्यामध्ये जवळपास तीस मिनीटे मनमोकळ्या गप्पा रंगल्या. एकमेकांच्या कुटुंबियांची त्यांनी आवर्जुन विचारपूस केली.
आघाडी सरकार असो की महाविकास सरकारमध्ये अजित पवार आणि नितीन राऊत यांची अनेक विषयावर मतभेद राज्याने बघितले आहे. दोघांचा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा असल्यामुळे हे मतभेद असणे स्वाभाविक आहे. मात्र दोन्ही नेत्यामधील वैयक्तिक संबध कायम असल्याचे या भेटीच्या निमीत्ताने स्पष्ट झाले.
कित्येक वर्षानंतर दादा जेतवन बंगल्यावर आले. जुन्या पर्णकुटी बंगल्याचे रुपडे पालटले असल्याची प्रतिक्रियाही दादांनी आवर्जुन दिली. पर्णकुटी बंगल्यावर माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे अनेक वर्षे वास्त्यव्य होते. त्यावेळी अजितदादा पर्णकुटी बंगल्यावर येणे जाणे असायचे.
एरवी आपल्या कॅबीनेट सहकाऱ्यांच्या भेटायला त्यांच्या बंगल्यामध्ये अभावाने जाणारे अजित पवार थेट नितिन राऊत यांच्या मलबार हिलमधील पर्णकुटी या बंगल्यावर पोहोचले आणि काही शासकीय विषय वगळता दोन्ही नेत्यामध्ये जवळपास ३० मिनीटे गप्पा रंगल्या.
शरद पवारही आमच्या घरी आवर्जुन येत असतात असं उर्जामंत्री नितीन राऊत सकाळशी बोलताना सांगीतले मात्र मुंबईत या दोन्ही नेत्यांचा हसरा फोटो पहिल्यांदा पाहयाला मिळाला. याचा आंनद दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.