जेजुरीच्या चंपाषष्ठी उत्सवात असे भरले रंग...

सोमवार, 2 डिसेंबर 2019

जेजुरी (पुणे) : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरीच्या खंडोबा गडावर आज कुलधर्म कुलाचारासाठी राज्यभरातून भाविक आले होते. सकाळी खंडोबाचे घट उठल्यानंतर महापूजा व महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. चंपाषष्ठीनिमित्त जेजुरीत रविवारपासून गर्दी होण्यास सुरवात झाली होती. रविवारी रात्री गावात तेलहंडा मिरवणूक, तेलवन व हळदीचा कार्यक्रम झाला. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता खंडोबाचे घट उठले. उत्सवमूर्ती भंडारगृहात ठेवण्यात आल्या. त्यानंतर महापूजा झाली. भरीत रोडगा व भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर गडावर अन्नदान सुरू करण्यात आले.