PHOTOS : छत्रपती संभाजीनगरमध्ये राड्यानंतर तणावपूर्ण शांतता

Chhatrapati Sambhajinagar violence
Chhatrapati Sambhajinagar violenceesakal
Updated on

छत्रपती संभाजी नगरमधील किऱ्हाडपुरा येथे बुधवारी रात्री दोन गटामध्ये हिंसाचार झाला आहे. किराडपुरा येथील राम मंदिराबाहेर रात्री साडेबारा वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यानंतर काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यानंतर दगडफेक झाली.

हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. शिवाय पोलिसांची वाहनेही पेटवून दिली.

या घटनेनंतर गुरुवारी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल केला.

हल्लेखोरांनी १५ गाड्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे, दंगा भडकवणे आदी कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी तपासासाठी ८ पथके नियुक्त केले आहेत

संभाजीनगरमधील घटना दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र काही लोकांचा प्रयत्न आहे की भडकवणारे स्टेटमेंट देऊन परिस्थिती चिघळली पाहिजे. अशा नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजून घेण्याची गरज आहे. - देवेंद्र फडणवीस

चुकीचे स्टेटमेंट देऊ नये सर्वांनी शांतता पाळावी. याला राजकीय रंग देण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्यापेक्षा दुर्दैवी काहीच नाही, असं आवाहन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

दरम्यान, रात्री रस्त्यावर मंदिराशेजारी उभ्या असलेल्या वाहनांना पेटवून दिल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अफवा पसरली. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी या परिसरात जाऊन सगळ्यांना शांततेचं आवाहन केलं.

सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र इथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राम मंदिरात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही.

खासदार इम्तियाज जलील, अतुल सावे, प्रदीप जयस्वाल आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी स्वत: मंदिरात कोणतीही हानी नाही, अशी माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com