मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शपविधी सोहळ्यातील क्षणचित्रे

शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

मुंबई : ‘‘मी उद्घव बाळासाहेब ठाकरे, ईश्‍वरसाक्ष शपथ घेतो की...’’  हा आवाज शिवाजी पार्कवर घुमताच उपस्थित हजारो शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. राज्यभरातील शिवसैनिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आज वीस वर्षांनंतर प्रत्यक्षात आला. आकाशातील सूर्य मावळतीला जात असताना शिवसेनेचा सत्तासूर्य उगवला. राज्य आणि देशभरातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रिपदी विराजमान झाली आहे. उद्धव यांच्यासह अन्य सहा नेत्यांचा शपथविधीही या वेळी पार पडला.