PHOTO : गारपीट अन् अवकाळी पावसाने होत्याचं नव्हतं केलं!
मुंबईः आज राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळीसह पावसासह गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात गारपीटीसह जोरदार पाऊस झाला.
शनिवारी दुपारी वाघूळखेडा, दिगर, शफेपुर, खडकी, रामनगर, साखरवेल, पळशी, वासडी, कोळंबी मांजरा, भारंबा, वाडी, तांडा भारंबा, शफियाबाद, भिलदरी, मोहंद्री आदी गावात सुमारे अर्धा तास जोरदार पावसासह गारपीट झाली. खातखेडा व रामनगर शिवारात गारपिटीचे प्रमाण जास्त होते.
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांचा गहू, मका, कांदे, हरभरा, मिरची पिकांना मोठा फटका बसला.
अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या किनवटमध्येही अवेळी पाऊस आणि गापिटीचा तडाखा बसला.
दाभाडी, दरसांगवी, पारडी बोधडी, कोपरा, थारा, सावरगाव, सावरी,डोंगरगाव, चंद्रपूर,पिपरफोडी दिग्रस,माळकोल्हारी, इंजेगाव,सिंगरवाडी,पाटोडा, देवलानाईकतांडा,अंदबोरी,दहेगाव, चिखली, टींगनवाडी, बेंदी प्रधानसागवी या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मका ,ज्वारी, गहू पिकाचे नुकसान झाले आहे.