टी २० सीरीजमधून टीम इंडियाच्या 'या' ११ खेळाडूंना डच्चू

साऊथ अफ्रिकेविरुद्ध टी २० सीरिजसाठी उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह यांसारख्या खेळाडूंना संधी दिली आहे. तर शिखर धवन, संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी यांसारख्या खेळाडूंना डच्चू दिला आहे.
Team India
Team Indiaesakal
Updated on

साऊथ अफ्रिकेविरुद्ध टी २० सीरिजसाठी उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह यांसारख्या खेळाडूंना संधी दिली आहे. तर शिखर धवन, संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी यांसारख्या खेळाडूंना डच्चू दिला आहे.

शिखर धवन: शिखर धवन सध्या फॉर्मात आहे. आयपीएलमधीले गेले दोन सीझनमध्ये तो अधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत आहे. त्याने पंजाबकडून खेळताना १४ डावात ३८ च्या सरासरीने ४६० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ३ अर्धशतक झळकावली आहेत. त्याचा स्ट्रईक रेट १२३ इतका आहे. तर निवडकर्त्यांनी धवना वगळत ईशान किशनला संधी दिली आहे. त्याने ३२ सरासरीने ४१८ धावा केल्या आहेत. ३ अर्धशकत ठोकले असून त्याचा स्ट्रइक रेट १२० इतका आहे.

संजू सॅमसन: राजस्थान रॉयल्सकडून खेळताना संजू सॅमसनने १५ व्या सीझनमध्ये कमालीचे प्रदर्शन केलं आहे. त्याचा संघ टेबलमध्ये नंबर २ वर आहे. विकेटकीपर फलंदाज सॅमसनने १४ डावात २९ च्या सरासरीने ३७४ धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने २ अर्धशतक झळकावलं आहेत.

तिलक वर्मा : युवा खेळाडू तिलक वर्मा याने आयपीएल १५ व्या सीझनमध्ये आपल्या खेळीनं सर्वांचे लक्ष वेधलं. त्याची खेळी पाहून तो टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये उतरु शकतो असे संकेत हिटमॅन रोहितने दिलं होते. त्याने संधीचे सोनं करत १४ मॅचमध्ये ३९७ धावा केल्या आहे. २ अर्धशतक ठोकले. आहेत.

राहुल त्रिपाठी: केकेआरकडून खेळताना राहुल त्रिपाठीने ३८ च्या सरासरीने ४१३ धावा केल्या. ३ अर्धशतक ठोकलं असून त्याचा स्ट्राईक रेट १५८ आहे.

पृथ्वी शॉ: दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉने १० सामन्यात २३८ धावा केल्या. २ अर्धशतक ठोकलें. गेल्या ३ ऱ्या सीझनपासून त्याचा स्ट्राईक रेट १५० हून अधिक आहे.

मोहम्मद शमी: सिनीअर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने १५ व्या सीझनमध्ये कमालीचे प्रदर्शन केलं. त्याने नव्या चेंडूवर प्रत्येक सामन्यात गुजरात टायटन्सला विकेट मिळवून दिल्या आहेत. मात्र, त्याला टी २० मालिकेतून वगळण्यात आलं. त्याने १४ मॅचमध्ये २३ च्या सरासरीने १८ विकेट घेतल्या आहेत.

टी नटराजन: सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा वेगवान गोलंदाज टी नटराजनने ११ मॅचमध्ये १८ विकेट घेतल्या आहेत.

मुकेश चौधरी: चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत मुकेश चौधरीने आयपीएलच्या १५ व्या सीझनमध्ये चांगली छाप सोडली आहे. त्याने १३ मॅचमध्ये १६ विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. तो नव्या खेळाडूवर संघाला नेहमी विजय मिळवून देतो.

मोहसिन खान: मोहिसनने लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना कमालीचे प्रदर्शन केले. त्याने ८ मॅचमध्ये १३ विकेट घेतल्या आहेत.

वॉश्गिंटन सुंदर: जायबंदीमधून पुनरागमन केलेला युना ऑफ स्पिनर वॉश्गिंटन सुंदरने ७ डावात १०१ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्रईक रेट १४६ असून ६ विकेट घेतल्या आहेत.

मयंक अग्रवाल: मयंक अग्रवालते टेस्ट प्रदर्शन चांगले आहे. अखेरच्या सीरीजमध्ये श्रीलंकेविरुद्ध २ मॅचमध्ये केवळ ५९ धावा करु शकला होता. मयंकने २१ टेस्टमध्ये १४८८ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com