- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
फक्त ज्ञानवापी नाही तर जगातल्या या सात धार्मिक स्थळांबद्दल आहेत वाद

जगात असे अनेक देश आहे, जिथे वारंवार धार्मिक वाद उफाळून येतो. वेगवेगळ्या सांप्रदायिकतेतून धर्माला घेऊन तणाव दिसून येतो. त्यातच भारतात सुद्धा हिन्दू-मुस्लिम विवाद अनेक वर्षापासून सुरू आहे. आज आम्ही तुम्हाला भारतासहीत जगातील विविध देशातील वादग्रस्त धार्मिक स्थळांविषयी सांगणार आहोत.

1. वेस्टर्न वॉल वेस्टर्न वॉल यहूदियांचे पवित्र स्थल माउंट मंदिरचे भिंत आहे. यहूदियांचे असे म्हणणे आहे की हे मंदिर त्या पवित्र दगडापासून बनलेले स्थान आहे जे एक एका पठारवर आहे तर मुस्लिम समुदायचे असे म्हणणे आहे की पैगंबर मोहम्मदनी या पवित्र स्थळावरून मक्का वरुन इथेपर्यंत यात्रा एका रात्रीत पुर्ण केली होती. मुस्लिम समुदाय वेस्टर्न वॉलला महत्वपूर्ण समजतात यामुळे दोन्ही पक्षात सातत्याने वादविवाद असतात.

2. ज्ञानवापी मशीद ही ज्ञानवापी मशीद उत्तर प्रदेशातील बनारस शहरात आहे. या मशिदीच्या वजू खानामध्ये सापडलेली एक आकृतीला हिंदू धर्माने शिवलिंग असल्याचा दावा केला आहे. त्याच वेळी, मुस्लिम धर्माचा दावा आहे की ती आकृती शिवलिंग नसून जुना तुटलेला कारंजा आहे. हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे.

३. पोटाला पॅलेस पोटाला पॅलेस बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक मानला जातो. असे मानले जाते की हे दलाई लामा यांचे पूर्वीचे घर होते.कारण चीनने तिबेटवर आक्रमण केले तेव्हा दलाई लामा येथेच राहिले होते. परंतु चीनने या जागेवर पैसे गुंतवले आणि त्याचे संग्रहालयात रूपांतर केले, ज्यामुळे बौद्ध अनुयायी नाराज झाले असून त्यांचे पवित्र तीर्थक्षेत्र आता पर्यटन स्थळ बनले आहे.

४. द टेंपल माउंट यरुशलम शहरात वसलेले अल-अक़्सा मस्जिदला मुस्लिम समुह आपले पवित्र स्थळ मानतात तर यहुदी लोक याला आपले पवित्र स्थळ 'द टेंपल माउंट' समजतात. या दोन्ही धर्मांमध्ये या जागेवरून वाद सुरु आहे.

५. प्रीह विहार मंदिर कंबोडिया आणि थायलंड सीमेवरील प्राचीन प्रीह विहार मंदिराच्या आजूबाजूच्या विवादित जमिनीवर दोन्ही देश दीर्घकाळापासून आपले हक्क सांगत आहेत. यावरून या दोन्ही देशांमध्ये वाद उफाळून येत आहे.

६. प्रल्हादपुरी मंदिर प्रल्हादपुरी मंदीर पाकीस्तानातील मुल्तान शहरात आहे. या मंदिराचे निर्माण भक्त प्रल्हाद याने भगवान नरसिंहाच्या सन्मानार्थ बनविले होते. परंतू जेव्हा बाबरी मस्जिद तोडण्यात आली तेव्हा पाकिस्तानातील हे प्राचीन मंदीर तोडण्यात आले.

७. अयोध्या मंदीर अयोध्या मंदीरात एकेकाळी बाबरी मस्जिद होती. तर ६ डिसेंबर १९९२ ला ही बाबरी मस्जिद तोडण्यात आली. या ठिकाणी हिंदूचे मंदीर होते, असा दावा हिंदूनी केला होता. सध्या या ठिकाणी राम मंदीराचे बांधकाम सुरू आहे.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.