द्रुतगती महामार्गावर प्रवासाचा वेळ वाचणार, मिसिंग लिकंचे काम वेगात सुरु

गुरुवार, 9 जानेवारी 2020

पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर अनेकदा जड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत लहान वाहनांना अडकून पडावे लागते. त्यावर पर्याय म्हणून लोणावळा ते खोपोली दरम्यान खास जड वाहनांच्या वाहतुकीसाठी भुयारी मार्गाद्‌वारे तयार करण्यात येणाऱ्या मिसिंग लिंकचे काम वेगात सुरु आहे, त्यामुळे 2022 पासून या मार्गावरील लहान वाहनांचा प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे.

काय आहे मिसिंग लिंक ?
द्रुतगती मार्गावरुन ये-जा करणाऱ्या जड वाहनांसाठीचा हा रस्ता चार पदरी असणार आहे. वाहनांना बाहेर जाण्यासाठी मिसिंग लिंकमध्ये प्रत्येक 300 मीटर अंतरावर एक्‍जिट ठेवण्यात येणार आहे. लोणावळा ते खोपोली दरम्यानचा रस्ता भुयारी राहाणार असल्यामुळे अमृतांजन घाटाचा परिसर हलक्‍या वाहनांसाठी मोकळा राहणार आहे. जड वाहनांमुळे द्रुतगती महामार्गावर रात्रीच्या वेळेत वाहतूक कोंडीचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात, याखेरीज घाटामध्ये होणारे जड वाहनांचे अपघात असे प्रकार यामुळे पूर्णपणे थांबणार आहेत. लोणावळ्यामधून मिसिंग लिंकमध्ये जाणाऱ्या जड वाहनांना खोपोली येथे द्रुतगती महामार्गावर बाहेर पडता येणार आहे. (सकाळ छायाचित्रसेवा - अरुण गायकवाड)