Flemingo Birds At Jayakwadi In Aurangabad
Flemingo Birds At Jayakwadi In Aurangabad esakal

फ्लेंमिगोंची भरली शाळा, बदलत्या वातावरणामुळे पाहुणे पक्ष्यांचे उशिरा आगमन

लाखोंच्या संख्येने लडाख, अमेरिका, सैबेरिया, मध्य आशिया, युरोप, आफ्रिका, नेपाळ, चीन, पाकिस्तान अशा दूर देशावरून स्थलांतर करून हे पक्षी भारतात येतात.

पैठण (जि.औरंगाबाद) : पैठण (Paithan)येथील जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागरातील पक्षी अभयारण्य परिसरातील पाणलोट क्षेत्रात यंदा चार महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर फ्लेमिंगो (अग्नीपंख) या पाहुण्या पक्षाचे उशिरा आगमन झाले आहे. पक्षी मित्रांना पक्षी निरीक्षण करताना फ्लेमिंगो पक्षाचा हा थवा सोमवारी (ता. २८) आढळून आला आहे. यामुळे पक्षीमित्रात आनंद व्यक्त होत आहे. निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये फ्लेमिंगो पक्षाचे होणारे आगमन उशिरा झाले असल्याचे निरीक्षण पक्षीमित्रांकडून नोंदविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com