PHOTO : सुदृढ आरोग्याची मनोकामना करत हरतालिका पुजन

Hartalika-puja-photo
Hartalika-puja-photoesakal
Updated on

हिंदू पंचागानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरतालिका उपवास केला जातो. हरतालिका व्रताला स्त्रियांच्या व्रतांमध्ये विशेष स्थान आहे. पतीच्या दीर्घ, आनंदी आयुष्य आणि आरोग्यासाठी स्त्रिया या दिवशी निर्जळ उपवास करतात.

असं मानल जात की अविवाहित मुलींनी या दिवशी शिव-पार्वतीची पूजा केली तर त्यांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होतात. तसेच विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुखाने जगू लागते.

भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने केलं होतं व्रत हरतालिका तृतीया साजरी करण्यामागे अशी अख्यायिका आहे. हरतालिकेची एक पौराणिक कथा आहे. पार्वतीच्या इच्छेव्यतिरिक्त भगवान विष्णुने तिच्याशी विवाह करू नये म्हणून तिच्या मैत्रिणी तिला जंगलात घेऊन जातात. तिथे देवी पार्वतीने भगवान शंकराची आराधना केली आणि भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी मातीचं शिवलिंग तयार करून त्याची पुजा केली. पार्वतीच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शंकराने देवी पार्वतीचा पत्नी म्हणून स्विकार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com